(फोटो- सोशल मीडिया)
सीए पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यश ठिगळे, (Career News) प्रणव पाटील, स्वराली गोगटे, स्मिएट बोथरा, मृणाल नलावडे, रश्मी चौधरी, सोहम इनामदार, जयेश जाधव, उज्ज्वल अग्रवाल, अनुष्का तावरे, नचिकेत पुणेकर आणि ललित पाटील यांचा समावेश आहे.
एमएमसीसी संस्थेचे संस्थापक प्राचार्य बी. जी. जाधव यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. एका बॅचमधील १२ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणे ही संस्था सातत्याने करत असलेल्या प्रगतीची आणि दर्जेदार शिक्षणाच्या बांधिलकीची साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सीए अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे यश हे महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाचे प्रतीक असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीए फायनल परीक्षेत आरव्हीजी फाऊंडेशनचा दबदबा
सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल (CA Final Exam Result 2025) सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून, आरव्हीजी एज्युकेशनल फाउंडेशनच्या (RVG Educational Foundation) विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा नेत्रदीपक यश मिळवत संस्थेचा गौरव वाढवला आहे.
यंदा आरव्हीजी फाउंडेशनचे एकूण ७३ विद्यार्थी यशस्वीरित्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी तीन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय स्तरावर (All India Rank – AIR) यश मिळवले आहे, ज्यात AIR ४३, AIR ४४ आणि AIR ४९ या रँक्सचा समावेश आहे. उत्कृष्टतेची आपली परंपरा कायम राखत, आरव्हीजीने ६०% हून अधिक उत्तीर्णतेचे उल्लेखनीय प्रमाण राखले आहे. हा आकडा राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे, ज्यामुळे महत्त्वाकांक्षी चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी आरव्हीजी हे देशातील सर्वात प्रतिष्ठित शिक्षण केंद्रांपैकी एक म्हणून सिद्ध झाले आहे.






