मुंबई: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यानंतरही भाजप आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप करणे सुरू ठेवले. धनंजय मुंडे आणि परळीतील गुन्हेगारीच्या घटनाही हळूहळू उजेडात येऊ लागल्या. बीडमधील गुन्हेगारांवर धनंजय मुंडेंचा वरदहस्त आहे. असाही आरोप त्यांच्यावर होऊ लागला. पण धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अजय मुंडे म्हणाले की, “दोघे बहीण-भाऊ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ मंत्री झाले ते विरोधकांच्या डोळ्यात खुपायला लागले आहे. राजकारणात धनंजय मुंडेंवर कोणतेही आरोप झाले नाही. पण तब्येतीच्या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांची तब्येत खूप खराब झाली आहे. आम्ही सर्व कुटुंबीय त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्यावर कुणाचीही नाराजी नाही.
Bomb Threat: मोठी बातमी! ‘या’ नामांकित कॉलेजमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल; पोलिस सतर्क
धनंजय मुंडे साहेबांवर जीवापाड प्रेम करणारे हजारो मित्र आहेत. पण आम्हाला फक्त संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा आहे. त्यासाठी त्यांचा कोणताही कार्यकर्ता बोलत नाहीये. तो न्याय आपल्याला न्यायव्यवस्थेकडून घ्यायचा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सनसनाट्या आम्हाल निर्माण करायच्या नाहीत. आम्हीही सुरेश धसांविरोधात बोलू शकतो. असा टोलाही त्यांनी लगावला.
अजय मुंडे म्हणाले, “तेही किती धुतल्या तांदळाचे आहेत. ते आपल्याला दिसत आहेच. त्यांच्या खोक्याचे पितळ आज उघडे पडले. या खोक्याचा आका कोण आहे. सुरेश धस म्हणतात तो साधा कार्यकर्ता आहे. पण हाच साधा कार्यकर्ता जो 200 हरणांची शिकार करून खातो. याच्या मागे सुरेश धस नाहीत, हे शक्य नाही. त्यामुळे या खोक्याच्या प्रकरणातही सुरेश धसांना सहआरोपी करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे.
धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हल्ले करण्याच कारण काय, असं विचारले असता, अजय मुंडे म्हणाले की, “धनंजय मुंडेंवर आरोप करण्यासाठी कोणताच मुद्दा न मिळाल्याने त्यांच्यावर कौटुंबिक हल्ले केले गेले. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. माध्यमांसमोर येऊन आरोप करत सुटायचं त्याला काही अर्थच नाही. कुटुंबावर हल्ले होत असतील तर कुटुंबातून कुणीतरी बोललं पाहिजे म्हणून मी बोलत आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी इथे आलोय.’ असेही अजय मुंडे यांनी नमुद केले.
चार्जशीटमध्ये परळीतील धनंजय मुंडे यांच्या जनमित्र कार्यालयातून खंडणी मागण्यात आली, असा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. तिथे नेमकं काय सुरू आहे, असा सवाल विचारण्यात आला. यावर बोलताना अजय मुंडे म्हणाले की, मी चार्जशीट पुर्णपणे वाचलेली नाही. पण चार्जशीटमध्ये उल्लेख असल्यामुळे ती बाब आता कोर्टात गेली आहे. न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही. यात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे दोेघेही आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत आहेत. मुंडे कुटुंबाचा आणि आरोपींचा कुठलाच संबंध नाही. आरोपींना कठोश शिक्षा झाली पाहिजे, ही आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करत आहोत.
काँगोत फुटबॉल खेळाडूंनी भरलेली बोट नदीत पलटली; 25 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
परळीत ज्या घटना घडत होत्या त्यावरून धनंजय मुंडेंवर आरोप झाले, हे आरोप राजकीय प्रेरित आहेत. धनंजय मुंडेंना राजकारणात हरवू शकत नाही म्हणून त्यांना बदनाम केलं जात. संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचं कोणी समर्थन करूच शकत नाही. पण नाहकपणे आज परळीची बदनामी होत आहे. त्याचं वाईट वाटतं. राख वाहतूक, वाळ उपसावरील आरोपांमध्येही काहीच तथ्य नाही, जी राख असते. ही थर्मलची राख आहे ही राख लवकरच उचलली नाही तर तिच्यामुळे प्रदुषण होण्याची शक्यता असते. वीटभट्ट्यामध्येही अशीच राख असते. असंही अजय मुंडेंनी स्पष्ट केलं.