काँगोत फुटबॉल खेळाडूंनी भरलेली बोट नदीत पलटली; 25 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आफ्रिकन देश काँगोत एक दुर्घटना घडली आहे. काँगोच्या पश्चिमेकडील प्रांत माई-न्डोम्बेजवळील नदीत बोट उलटून 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, बोटीत नगाम्बोमी गावातील फुटबॉल खेळाडू होते. हे खेळाडू मुशी शहरात सामना खेळून परतत असताना ही दुर्घटना घडली. स्थानिक वेळेनुसार, रात्री 11 च्या सुमारास मुसाशी बंदल सोडल्यानंतर 12 किलोमीटर अंतरालवर बोट उलटली. यामागचे कारण रात्रीचा प्रवास सांगण्यात येत आहे.
अपघाताचे कारण
मुशी क्षेत्राचे स्थानिक प्रशासकांच्या मते, रात्री कमी प्रकाश असल्यामुळे बोट नियंत्रणाबाहेर गेली असावी. रात्रीच्या प्रवासामुळे सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होते. यामुळे रात्रीचा प्रवास अपघाताचे मोठे कारण असल्याचे प्रशासकांनी म्हटले आहे. स्तानिक प्रशासक रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जणांना सुखरुप वाचवण्यात आले आहे. मात्र अनेक लोक अजूनही बेपत्ता असून शोधकार्य सुरु आहे.
काँगोमध्ये बोट अपघात सामान्य
काँगोत अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असतात. काँगोत जलमार्गच लोकांसाठी प्रवासाचे मुख्य साधन आहे. देशातील बहुतेक रस्ते खराब अवस्थेत आहेत किंवा वापरण्यासाठी योग्य नाहीत. यामुळे प्रवासासाठी नागरिक नदी प्रवासावर अवलंबून आहेत. मात्र, सरकारकडून बोटींच्या सुरक्षिततेवर दुर्लक्ष होत आहे. बोटींची तपासणी वेळवर होत नाही, तसेच अनधिकृत बोटीही मोठ्या प्रमाणावर चालवल्या जातात.
गेल्या काही वर्षांत मोठ्या दुर्घटना
गेल्या काही वर्षात काँगोत अनेक बोट अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत शएकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.काँगोतील
लोक नद्यांद्वारे प्रवास करतात, पण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न झाल्याने हे प्रवास जीवघेणे ठरतात. सरकारने, नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अद्याप मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा दिसतो. प्रत्येक वर्षी अशा अपघातांमध्ये अनेक लोक आपले प्राण गमावतात. या परिस्थितीत बदल होण्यासाठी सरकारने अधिक कठोर नियम लागू करणे आणि प्रवाशांनीही सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.