
Marathi Breaking news live updates: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे, या घटनेचे धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर काल (3 मार्च) रात्री उशिरा राजकीय हालचालींना वेग आला. सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज धनंजय मुंडे आपला राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे.
04 Mar 2025 02:16 PM (IST)
टेक जायंट अॅपलने iOS 18.4 चे दुसरे बीटा व्हर्जन रिलीज केले आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वीच iOS 18.4 चे पहिले बीटा व्हर्जन रिलीज करण्यात आले होते. मात्र आता कंपनीने या अपडेटचे दुसरे बीटा व्हर्जन iOS 18.4 beta 2 रिलीज केलं आहे. या अपडेटमध्ये युजर्सना अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. iOS 18.4 बीटा 2 सध्या फक्त चाचणीसाठी उपलब्ध आहे. या अपडेटमुळे आयफोन युजर्सना अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील. अॅपलने अद्याप त्याचा सार्वजनिक बीटा रिलीज केलेला नाही.
04 Mar 2025 01:27 PM (IST)
काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. पण आता मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास शास्त्री यांनी नकार दिला आहे.
04 Mar 2025 01:11 PM (IST)
छत्रपती संभाजी माहाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत अबू आझमी यांना माफी मिळूच शकत नाही, असा तीव्र संताप सकल मराठा समजाचा बांधवांनी केला आहे. आझमी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजात रोष पसरला असून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला आहे.
04 Mar 2025 12:56 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अयोग्य आहे, असे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
04 Mar 2025 12:51 PM (IST)
यापूर्वी मी देखील नैतिकेच्या आधारे राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी ही नैतिकता आधीच दाखवायला हवी होती, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
04 Mar 2025 12:44 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या पाच वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसने आवाज उठवत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली. प्रशासनातील भ्रष्ट व माजोरडे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
04 Mar 2025 12:20 PM (IST)
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडेयांनी अखेर राजीनामा दिला आहे.बीडमध्ये कडकडीत बंद करण्यात आले आहे.
04 Mar 2025 11:59 AM (IST)
महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे म्हणाले, "राजीनामा देणे हा उपाय नाही. हे सरकार बरखास्त करायला हवे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूपच वाईट आहे. इथे कोणीही सुरक्षित नाही.
04 Mar 2025 11:55 AM (IST)
लोकप्रिय आणि आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या Realme ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme 14 Pro Lite 5G हा नवीन स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Realme 14 Pro Lite 5G Lite 5G हा स्मार्टफोन Realme 14 Pro सिरीजमधील एक नवीन स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Xiaomi, OPPO आणि Vivo सारख्या कंपन्यांच्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससोबत स्पर्धा करणार आहे. स्मार्टफोनची किंमत 25 हजारांहून कमी आहे. किंमत जरी कमी असली तरी या स्मार्टफोनमध्ये मजेदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
04 Mar 2025 11:52 AM (IST)
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया आली आहे. "धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा असं मी लगेच म्हणणार नाही. एसआयटीचे मी मनापासून आभार मानीन. चार्जशीटची 32 पानं माझ्याकडे आहेत. पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचा हक्क एसआयटीने अबाधित ठेवलाय. एसआयटीने पुढील तपास करावा. संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सात मागण्यांच पत्र दिलं आहे. त्यातील एक मागणी मान्य झाली. इतर सहा मागण्यांचा तपास झाला पाहिजे" अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
04 Mar 2025 11:46 AM (IST)
सावंतवाडी तालुक्यातील दाभिल येथील जंगलमय परिसरात असलेल्या पांडवकालीन विहिरीमध्ये पट्टेरी वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे सावंतवाडी तालुक्यात ठिकाणी पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच जंगलात त्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा करून वाघाचा मृतदेह जाळून नष्ट केला. सदर घटनास्थळ दाभील गावातून ३ किलोमीटर आत घनदाट जंगलात असून वाघ भक्षाच्या शोधात पाठलाग करीत असताना ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
04 Mar 2025 11:44 AM (IST)
ग्रामीण भागात जाऊन होळ्या आणण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर रत्नागिरीत शिमगोत्सावाला सुरुवात झाली आहे.
04 Mar 2025 11:29 AM (IST)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
04 Mar 2025 11:26 AM (IST)
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावावा. त्यांची घटीका जवळ आलीय, हे स्पष्ट दिसत आहे. मात्र, अशा वेळी अजित पवार यांनी आपला निर्णय बदलू नये. मुंडेंच्या राजीनाम्यामुळे आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काहीही फायदा होणार नाही."
"राज्यातील प्रत्येक व्यक्तीने हे हृदयद्रावक छायाचित्र पाहिले आहे. हे फोटो पाहिल्यावर प्रत्येक संवेदनशील माणूस भावनिक झाला असेल. अशा अमानुष घटनेने मन सुन्न झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य केल्या याबद्दल त्यांचे आभार मानतो. आता मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवले जाईल."
04 Mar 2025 11:14 AM (IST)
बीड सरपंच हत्या प्रकरणावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, "ही अत्यंत वेदनादायक घटना आहे... मी रात्रभर झोपू शकले नाही. आपण बाहेरचे आहोत, पण कल्पना करा, त्याच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली असेल. माझा ठाम विश्वास आहे की दोषींना फाशीची शिक्षा व्हावी. जे कोणी या प्रकरणात थेट किंवा अप्रत्यक्षपणे सामील आहेत, त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आणि तुरुंगात टाकले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळेच मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि अन्य आरोपी सध्या तुरुंगात आहेत. देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कुणालाही सोडले जाणार नाही."
04 Mar 2025 11:08 AM (IST)
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. अबू आझमी यांनी राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत पत्राद्वारे औपचारिक मागणी केली आहे.
04 Mar 2025 11:05 AM (IST)
महिलांना २५०० रुपये मिळावेत या मागणीसाठी आम आदमी पार्टी निषेध करणार आहे. विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि सर्व आमदार निषेधात सहभागी होतील. सकाळी ११.३० वाजता कॅनॉट प्लेसमधील राजीव चौक मेट्रो स्टेशनबाहेर निदर्शने केली जाईल.
04 Mar 2025 10:19 AM (IST)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या थरारक, भयानक आणि घृणास्पद फोटो आणि व्हिडिओंनी महाराष्ट्र सुन्न झालाय. संतोष देशमुख यांच्या शरीराशी अक्षरशः खेळणाऱ्या या हैवानांना फाशी दिलं तरी ती शिक्षा कमी होईल आणि राक्षसांनाही लाज वाटेल असंच एकंदर हे हत्याकांड…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 3, 2025
04 Mar 2025 10:14 AM (IST)
वृत्तवाहिन्यांनी स्व. संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे फोटो प्रसारीत केले आहेत. हे फोटो पाहताना कोणत्याही संवेदनशील माणसाचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. हे फोटो पाहताना किती क्रूरपणे ही हत्या झाली असावी याचा अंदाज येतो. ही घटना आणि त्यातील क्रौर्य प्रचंड अस्वस्थ करणारे…
— Supriya Sule (@supriya_sule) March 4, 2025
04 Mar 2025 10:09 AM (IST)
सध्या सोशल मीडियावर बीड जिल्हा बंदच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास तीन महिने पूर्ण होत आले असून, या अमानुष हत्येचे काही धक्कादायक फोटो समोर आल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या हत्येच्या निषेधार्थ आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मोठा पाठिंबा मिळत असून, “नराधमांच्या क्रौर्याचा निषेध करू”, “एक दिवस कुलूप लावून शासनाचा विरोध करू” आणि “संतोष अण्णा, आम्ही लढूच” अशा घोषणांसह नागरिक एकजूट होत आहेत.