संजय राऊतांना नाना पटोलेंनी फटकारलं; ‘निवडणुका लागतील त्यावेळी...’
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट)-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. पण, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळाले नाही. इतकेच नाहीतर अनेक दिग्गज नेतेमंडळींचा या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, त्यावेळी हा राजीनामा झाला नाही. पण, आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले आहे. याच पदावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ 16 च जागा जिंकता आल्या, त्यानंतर आता काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, असा अंदाज लावला जात आहे. कारण, पृथ्वीराज चव्हाण यांना हायकमांडकडून तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. ते दिल्लीला रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बनवण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हायकमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. याची काँग्रेसकडून दखल घेण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीकडे लक्ष
महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदावर पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागू शकते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, त्यावेळी हा राजीनामा झाला नाही.
विधानसभा निवडणुकीत कामगिरी खराबच
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी चांगली अशी दिसून आली नाही. ज्यामध्ये शिवसेनेला (ठाकरे गट) 20, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) केवळ 10 जागा जिंकता आल्या. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तरुण चेहऱ्यांना संधी द्या
पक्षातील तरुण चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी द्यावी, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. यासाठी चव्हाण यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं, असं सूचवलं आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.