Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aqua Line Mumbai Metro : सार्वजनिक वाहतूक दिनानिमित्त अॅक्वा लाईन प्रवाशांना भेट; बीकेसीत Cityflo ची मोफत फीडर बस सेवा

सार्वजनिक वाहतूक दिनानिमित्त ३ जुलै रोजी बीकेसी मेट्रो स्थानकावर अॅक्वा लाईन प्रवाशांसाठी Cityflo ची मोफत फीडर बस सेवा उपलब्ध होणार आहे. एमएमआरसी, एमएमआरडीए, WRI इंडिया आणि BKCMoves यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे बीकेसी परिसरातील लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2026 | 06:35 PM
सार्वजनिक वाहतूक दिनानिमित्त अॅक्वा लाईन प्रवाशांना भेट; बीकेसीत Cityflo ची मोफत फीडर बस सेवा

सार्वजनिक वाहतूक दिनानिमित्त अॅक्वा लाईन प्रवाशांना भेट; बीकेसीत Cityflo ची मोफत फीडर बस सेवा

Follow Us
Follow Us:
  • बीकेसीतील लास्ट-माईल प्रवास होणार सुलभ
  • मेट्रो-३ प्रवाशांसाठी ३ जुलैला मोफत फीडर बस
  • बीकेसीत सार्वजनिक वाहतूक दिनी मोफत बस सेवा
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), WRI इंडिया आणि BKCMoves यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जुलै २०२६ रोजी बीकेसी मेट्रो स्थानकावर ‘सार्वजनिक वाहतूक दिवस’ साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने अॅक्वा लाईन (मेट्रो मार्गिका-३) प्रवाशांसाठी Cityflo तर्फे बीकेसी परिसरात मोफत फीडर बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या विशेष उपक्रमामुळे बीकेसी मेट्रो स्थानकाच्या प्रवेश/निर्गमन द्वार A1 आणि A2 येथून प्रवाशांना बीकेसीमधील विविध महत्त्वाच्या ठिकाणी पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा शेवटच्या टप्प्यातील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि अखंड होणार आहे.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

फीडर बसद्वारे जिओ वर्ल्ड प्लाझा, वन बीकेसी, जेटवन एमएमआरडीए, कलानगर, बीडीबी गेट क्रमांक ७, आयसीआयसीआय बस स्टॉप आणि क्रेसेन्झो यांसारख्या प्रमुख ठिकाणी विनामूल्य सेवा दिली जाणार आहे. बीकेसी परिसरात कामासाठी येणारे कर्मचारी, व्यावसायिक आणि नागरिक यांना या सेवेचा मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या व्यावसायिक आणि आर्थिक केंद्रांपैकी एक असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. अॅक्वा लाईन (मेट्रो मार्गिका-३) सुरू झाल्यापासून बीकेसीपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी झाला असून आता मोफत फीडर बस सेवेमुळे मेट्रो स्थानकापासून कार्यालये आणि इतर ठिकाणांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.

अॅक्वा लाईनमुळे आरे जेव्हीएलआर ते कफ परेड दरम्यान जलद प्रवास शक्य झाला असून मरोळ नाका (मेट्रो-१), सीएसएमटी, चर्चगेट, दादर, ग्रँट रोड, महालक्ष्मी आणि माहीम या उपनगरी रेल्वे स्थानकांशी महत्त्वाचे इंटरचेंज उपलब्ध झाले आहेत. तसेच पादचारी पुलाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ ला मेट्रो स्थानकाशी जोडण्यात आले आहे, त्यामुळे विमानतळापर्यंतचा प्रवासही अधिक सुलभ झाला आहे.

‘सार्वजनिक वाहतूक दिवस’ या उपक्रमामागील मुख्य उद्देश नागरिकांना एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणे, कार्बन उत्सर्जनात घट घडवून आणणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणे हा आहे. या उपक्रमामुळे मेट्रो आणि फीडर बस यांचे प्रभावी एकत्रीकरण होऊन मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

MMRDA : मान्सूनपूर्व महा मुंबई मेट्रो अलर्ट मोडवर; २,४९६ सीसीटीव्ही अन् २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवर आराखडा लागू

Web Title: Metro 3 aqua line free cityflo feeder bus service bkc public transport day 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • bkc
  • Bus Service
  • Mumbai metro 3

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.