Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवामानशास्त्र विभागाचा अंदाज 2026 मध्ये नैऋत्य मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता

जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 90% ते 95% दरम्यान

  • By Dilip Bane
Updated On: Apr 14, 2026 | 01:31 PM
35% probability of below-normal rainfall

35% probability of below-normal rainfall

Follow Us
Follow Us:

         मान्सून 2026 अंदाज – ठळक मुद्दे

  • India Meteorological Department (भारतीय हवामान विभाग) यांचा अंदाज: 2026 मध्ये नैऋत्य मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
  • जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 90% ते 95% दरम्यान
  • सर्वाधिक शक्यता असलेला अंदाज: 92% पाऊस
  • 1971 ते 2020 या कालावधीतील सरासरी पाऊस: 87 सेमी, यंदा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. देशभरात २०२६ चा नैऋत्य मान्सून अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या हंगामात देशातील एकूण पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता असून, प्रत्यक्ष अंदाज ९२ टक्के इतका व्यक्त केला असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम असेल, त्यातही ऑगस्टनंतर हा परिणाम प्रकर्षाने दिसेल.

Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार

१९७१ ते २०२० या कालावधीवर आधारित देशातील सरासरी मान्सून पाऊस ८७ सेंमी इतका आहे. त्याच्या तुलनेत यंदा पावसात घट होण्याचे संकेत आहेत. सध्या प्रशांत महासागरात कमकुवत लानिनासारखी परिस्थिती असली तरी एप्रिल ते जूनदरम्यान एन्सो (ईएनएसओ-न्यूट्रल) स्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सून हंगामात एल-निनो विकसित होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. साधारणपणे एल-निनोमुळे भारतातील पावसावर नकारात्मक परिणाम होतो.हिंद महासागरात सध्या इंडियन ओशन डायपोल (आयओडी) न्यूट्रल स्थितीत आहे. मात्र मान्सूनच्या शेवटाकडे सकारात्मक आयओडी विकसित होण्याची शक्यता असून, त्याचा काही प्रमाणात पावसावर अनुकूल परिणाम होऊ शकतो. जानेवारी ते मार्च या कालावधीत उत्तर गोलार्धातील हिमावरण सामान्यापेक्षा कमी राहिल्याचा परिणाम मान्सूनवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Maharashtra Rain Alert: अबब! आज घरातच थांबा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस धुवून काढणार, अलर्ट काय?

काय सांगते आकडेवारी ?
यंदाच्या पावसाळ्याबाबत हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज आणि त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:

पावसाची श्रेणी पावसाचे प्रमाण (%) अंदाजाची शक्यता (%) ऐतिहासिक सरासरी (%)
अत्यल्प ९० पेक्षा कमी 35 16
सरासरीपेक्षा कमी ९० ते ९५ 31 17
सरासरी ९६ ते १०४ 27 33
सरासरीपेक्षा जास्त १०५ ते ११० 6 16

महत्त्वाचा निष्कर्ष
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा अत्यल्प (३५%) आणि सरासरीपेक्षा कमी (३१%) पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. म्हणजेच एकूण ६६% शक्यता ही पाऊस कमी पडण्याकडे झुकणारी आहे.

Web Title: Monsoon 2026 likely to be below normal imd predicts 92 percentage rainfall amid el nio concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
1

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता
2

पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
3

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
4

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.