महाराष्ट्राला पावसाचा इशारा (फोटो- aigemini )
राज्यात अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा
गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची शक्यता
अवकाळी पावसाने राज्यात दाणादाण
IMD Rain Alert: राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि काही जिल्ह्यात गारपीट देखील जळायचे पाहायला मिळाले. अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
सोलापूर, चंद्रपूर , नांदेड, पुणे, कोल्हापूर आणि अन्य जिल्ह्यात वीजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कालदेखील राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अचानक अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावल्याने नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंबा, काजू बागायतदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. हवामानातील बदलामुळे बागायतदर अडचणीत आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा तडखा बसला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा
पुणे शहरातील अनेक भागात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सिंहगड रस्ता परिसरात वडगाव, नांदेड सिटी परिसरात पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासून ढगाळ आणि उन्हाळी वातावरण पाहायला मिळाले. मात्र अचानक दुपारी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसामुळे गुढीपाडव्याच्या कार्यक्रमांवर थोडासा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे शहराप्रमाणेच राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये देखील गारपीट आणि जोरदार पाऊस झाला आहे.
पुन्हा पाऊस ! दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या खराब हवामानाचा शेतीपिकांवर मोठा परिणाम होत आहे. रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.






