Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: आधी घराचे भाडे भरले, नंतर अचानक गायब; १९ जणांची कोट्यवधींची फसवणूक

आधी काही महिने घराचे भाडे स्वतः भरून आरोपी महिलेने नागरिकांना विश्वासात घेतले. त्यानंतर विश्वास बसल्यावर मोठी रक्कम घेतली आणि अचानक भाडेही बंद केले; तपासात तब्बल १९ जणांची कोटींची फसवणूक उघड झाली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 10, 2026 | 03:01 PM
Mumbai Crime: आधी घराचे भाडे भरले, नंतर अचानक गायब; १९ जणांची कोट्यवधींची फसवणूक

Mumbai Crime: आधी घराचे भाडे भरले, नंतर अचानक गायब; १९ जणांची कोट्यवधींची फसवणूक

Follow Us
Follow Us:
  • Heavy Depositच्या आमिषाने १९ नागरिकांची कोटींची फसवणूक
  • काही महिने भाडे भरून आरोपी महिलेने मिळवला विश्वास
  • नवघर पोलिसांकडून ४ सप्टेंबरला महिला आरोपीला अटक
भाईंदर: नायगाव आणि पालघर परिसरातील बांधकाम प्रकल्पांमध्ये Heavy Depositच्या स्वरूपात रक्कम गुंतवल्यास घर भाड्याने देण्यासोबतच त्या घराचे भाडे आपणच भरू, असे आमिष दाखवून १९ नागरिकांची तब्बल १ कोटी ३६ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी एका महिला आरोपीला अटक केली आहे.

Heavy Depositचा नेमका डाव काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेने नायगाव आणि पालघर परिसरातील Construction Siteमध्ये Heavy Depositच्या स्वरूपात रक्कम गुंतवण्याचे आमिष नागरिकांना दाखवले. या गुंतवणुकीच्या बदल्यात संबंधितांना घर भाड्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. विशेष म्हणजे, घर उपलब्ध करून देण्यासोबतच त्या घराचे भाडेही आपणच भरू, असे आरोपी महिलेने नागरिकांना सांगितले. त्यामुळे योजनेत गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होईल, असा विश्वास नागरिकांना वाटला. या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेकांनी आरोपीकडे मोठ्या रकमा दिल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Crime News: वर्षानुवर्षे साधूचा वेश,पोलिसांची धाड पडताच समोर आला १९८८ मधील गुन्हा

काही महिने भाडे भरून विश्वास संपादन

रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपी महिलेने सुरुवातीला काही महिन्यांचे भाडे भरले. त्यामुळे नागरिकांचा तिच्यावर अधिक विश्वास बसला. मात्र काही काळानंतर अचानक भाडे देणे बंद करण्यात आले. त्यानंतर संबंधित नागरिकांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आणि भाडे बंद झाल्यानंतर नागरिकांनी आरोपीकडे पैशांबाबत विचारणा केली. मात्र तिने टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर संबंधित नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर आरोपी महिला फरार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

१९ नागरिकांची १.३६ कोटींची फसवणूक

नवघर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास करण्यात आला. तपासादरम्यान मिरा-भाईंदर परिसरातील तब्बल १९ नागरिकांची एकूण १ कोटी ३६ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यावर नवघर पोलिसांनी ४ सप्टेंबर २०२६ रोजी महिला आरोपीला अटक केली. या प्रकरणी गुन्हा रजि. क्र. ४८६/२०२६ अन्वये BNS कलम ३१८(४) आणि ३१६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नवघर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा: Vasai Car Accident: अचानक ब्रेक अन् ट्रकमधून थेट कारवर दगड-माती; वसई फाट्यावर थरारक घटना

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

Heavy Deposit, भाड्याचे घर किंवा गुंतवणुकीच्या आकर्षक योजनांमध्ये पैसे देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची ओळख, मालमत्तेची कागदपत्रे, करारपत्र आणि आर्थिक व्यवहारांची योग्य पडताळणी करावी. केवळ आकर्षक आश्वासनांवर विश्वास ठेवून मोठी रक्कम देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Mumbai crime paid house rent initially then suddenly vanished 19 people defrauded of crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.