Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MVA: महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ पैकी ‘इतक्या’ जागांचा तिढा सोडवला? लवकरच जागावाटप जाहीर करणार

महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी गेले काही दिवस सलगपणे बैठकांचे सत्र सुरू ठेवले आहे. राज्यातील २८८ जागांपैकी १४० ते १५० जागांवर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 02, 2024 | 07:37 PM
MVA: महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ पैकी 'इतक्या' जागांचा तिढा सोडवला? लवकरच जागावाटप जाहीर करणार

MVA: महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ पैकी 'इतक्या' जागांचा तिढा सोडवला? लवकरच जागावाटप जाहीर करणार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीने लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर विधानसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. काही जागांवर कहा तिढा सुटणे अजूनही बाकी आहे. मात्र येत्या काही दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीने मुंबईने ३६ पैकी २३ जागांवर तिढा सोडवला आहे असे म्हटले जात आहे. ३६ पैकी २३ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहे. त्यातच आता मुंबईतील ३६ पैकी २३ जागांचा तिढा सुटल्याचे समजते आहे. यामध्ये २३ जागांपैकी शिवसेना ठाकरे गट १३, कॉँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गट १ आणि समाजवादी पक्ष १ या जागांवर एकमत झाले आहे. तरी अजून १३ जागांचा प्रश्न सुटलेला नाही. यातील काही जागांवर तीनही पक्ष दावा करत आहेत. त्यामुळे या जागांवर एकमत किंवा तिढा सुटण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी गेले काही दिवस सलगपणे बैठकांचे सत्र सुरू ठेवले आहे. राज्यातील २८८ जागांपैकी १४० ते १५० जागांवर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. काही जागांवर तीनही पक्षांचा दावा असल्याने या जागांचा प्रश्न सुटणे अजून बाकी आहे.

महायुतीत काय घडतंय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.महाराष्ट्रातील सत्ताधारी ‘महायुती’ आघाडीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपस्थिती आणि भाजपच्या काही नेत्यांच्या मुस्लिम विरोधी प्रचाराला  राष्ट्रवादीचा विरोध या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते नेहमीच राष्ट्रवादीवर आक्षेप घेत आहेत, हे विशेष. पुढील महिन्यात होणाऱ्या २८८  सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तीन मित्रपक्षांनी जागावाटप निश्चित केलेले नाही.

Web Title: Mva solve 23 seats out of 36 in mumbai region for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 07:33 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
1

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Thane News : महायुतीला मोठा धक्का; सरचिटणीससह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा महविकास आघाडीत पक्षात प्रवेश
2

Thane News : महायुतीला मोठा धक्का; सरचिटणीससह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा महविकास आघाडीत पक्षात प्रवेश

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन
3

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला
4

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.