मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधकांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजिनाम्याची मागणी करत एकच गोंधळ केला. आज विधानभवनात भाजपाच्या वतीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी भाजपच्या आमदारांनी स्वाक्षरी केल्या. विधानभवनाच्या पायऱ्यांच्या शेजारी असलेल्या डायसवर भाजप नेते आपल्या सह्या करत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ तिथं आले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी नरहरी झिरवाळ यांना सही करण्यासाठी पेन दिला आणि त्यांनी सही केली.
[read_also content=”आधी रस्त्यावर घातला राडा, मग गाडीने तरूणाला नेलं फरफटत; कल्याणमध्ये दोन तरूणांचा ड्रामा मोबाईलमध्ये कैद https://www.navarashtra.com/india/7-killed-in-bomb-blast-4-houses-demolished-some-buried-in-heaps-nrps-248869.html”]
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाने दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आज विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यासाठी भाजपच्या वतीने विधीमंडळ परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेत भाजपने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही स्वाक्षरी करायला लावली. झिरवळ विधीमंडळाच्या इमारतीत प्रवेश करत असताना त्या ठिकाणी भाजपचे नेते पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. नरहरी झिरवळ येताच गोधळा दरम्यान झिरवळ यांच्याकडून भाजपच्या नेत्यांनी स्वाक्षरी करून घेतली. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र झिरवाळ यांची बाजू घेत, पायऱ्यांवर इतका गोंधळ असतो की माणूस गोंधुळन जातो. नरहरी झिरवळ ही साधी व्यक्ती आहे. आदिवासी समजातून आलेला आहे. कारण नसताना त्यांना घेरण्याचं काम करू नये, असे म्हटले आहे.
[read_also content=”भीषण बॉम्बस्फोटात ७ जणांचा मृत्यू, ४ घरे जमीनदोस्त, काही जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती, आयबीने काही दिवसांपूर्वी दिला होता अलर्ट https://www.navarashtra.com/india/7-killed-in-bomb-blast-4-houses-demolished-some-buried-in-heaps-nrps-248869.html”]