Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीपुरवठ्यासाठी नवी कार्यपद्धती, समन्वयातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करणार : पालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई : केंद्रीय प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात भूजल मुंबईतील टैंकर चालकांनी संप पुकारला आहे. मुंबई महापालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2025 | 07:47 AM
TANKER (फोटो सौजन्य- PINTEREST)

TANKER (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : केंद्रीय प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात भूजल मुंबईतील टैंकर चालकांनी संप पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली. असे असूनही टँकर चालक संप मागे घेत नसल्याने, व्यापक जनहित लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करुन त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी गृहनिर्माण संस्था (सोसायटी) यांच्यासह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील निश्चित केली आहे. केंद्रीय भू-जल प्राधिकरण यांनी नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार सर्व विहीर तसेच कूपनलिका धारकांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरण यांचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करावे, या अनुषंगाने मुंबई महापालिकेकडून मुंबईतील विहीर व कूपनलिका मालकांना नोटीस बजावण्यात आले होते. तथापि, या नोटिशींनंतर पाणी उपलब्धतेमध्ये अडचणी येऊ लागल्याने टैंकर चालक संघाने संप पुकारला आहे.

मुंबईमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का, माजी नगरसेवक संजय घाडी आणि उपनेत्या संजना घाडी यांचा शिवसेनेत प्रवेश

उष्मा वाढवा; संपावर तातडीने तोडगा काढावा

केंद्रीय भू-जल प्राधिकरणाचे बदललेले नियम आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टँकरचालकांच्या मागण्या व त्यांचा संप यावर तातडीने तोडगा काढावा. कारण मुंबईतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, याची काळजी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेला केली. तसेच, केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरणाला निर्देश दिले की, ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करण्यासाठी उपलब्ध असलेली एक खिडकी प्रणाली ‘भू-नीर’ ही अधिक सुलभ करावी. तसेच या प्रणालीविषयी जास्तीत जास्त जनजागृती करावी. त्याचप्रमाणे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करण्यासाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सहाय्य पुरवावे.

टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय

  • मुंबईतील विहीर व कूपनलिका धारकांना करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिशींना १५ जून २०२५ पर्यंत महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्थगिती दिली. सहकार्याची पावले उचलण्यात आल्यानंतरही टैंकर चालकांनी अद्याप संप मागे घेतलेला नाही.
  • त्यांच्या मागण्यांवर ते अडून आहेत. सबब, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्यासारख्या जीवनावश्यक गरजेचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, व्यापक जनहिताकरिता या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे.
  • या कायद्यातील कलम ३४ (अ) तसेच कलम ६५ (१) द्वारे महापालिका प्रशासनाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार, मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टैंकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे

प्रमाणित कार्यपद्धती

  • नियमित पद्धतीने टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिग्रहित करावयाचे टैंकर्स, टैंकर चालक आणि क्लीनर तसेच टँकरचालकांचे कार्यालयीन कर्मचारी यांची संख्या निश्चित केली जाईल. महापालिकेकडून आपत्कालीन व्यवस्थापन विभाग व विधि विभाग यांनी संयुक्तरित्या अधिसूचना तयार करावी. ही अधिसूचना निर्गमित केल्यानंतर त्यानुसार परिवहन आयुक्त यांनी आवश्यक वाहने, चालक आणि क्लीनर कर्मचारी यांची आज सायंकाळपर्यंत महापालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावर नियुक्ती करावी.
  • महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांच्या (वॉर्ड) स्तरावर संबंधित सहायक आयुक्तांनी पथक गठीत करावे. यामध्ये सहायक अभियंता (जलकामे), कीटनियंत्रण अधिकारी, आरोग्य अधिकारी (वैद्यकीय), लेखा अधिकारी यांच्यासह निरीक्षक (प्रादेशिक परिवहन अधिकारी), स्थानिक पोलीस निरीक्षक आदींचा समावेश असेल.

Web Title: New procedure for water supply water supply through tankers will be smoothed through coordination municipal commissioners instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 07:47 AM

Topics:  

  • Mumbai Water
  • Mumbai Water Supply
  • Water Tanker

संबंधित बातम्या

Mumbai Water News: मुंबईकरांसाठी खुशखबर! तानसा ओसंडून वाहू लागला, पाण्याची चिंता मिटली
1

Mumbai Water News: मुंबईकरांसाठी खुशखबर! तानसा ओसंडून वाहू लागला, पाण्याची चिंता मिटली

Purandar News: खुशखबर! अवकाळी पावसाची पुरंदरवर कृपा; तालुका झाला टँकरमुक्त
2

Purandar News: खुशखबर! अवकाळी पावसाची पुरंदरवर कृपा; तालुका झाला टँकरमुक्त

Solapur News: टँकरची मागणी आल्यास ४८ तासांत…”; मंत्री जयकुमार गोरेंचे निर्देश
3

Solapur News: टँकरची मागणी आल्यास ४८ तासांत…”; मंत्री जयकुमार गोरेंचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.