मुंबई: मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे रिमझिम पाऊस झाला आहे. शहरात आज रिमझिम सरी बरसल्यानं मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अशातच ऐन भंडीच्या दिवसात पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा साथीच्या रोगांना आमंत्रण मिळेल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. तसेच पश्चिम विदर्भातील अमरावतीत देखील एक-दोन ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे.