Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: पाच महिने उलटूनही भांडुप बस अपघातग्रस्तांना अद्याप शासकीय मदत नाही! राजोल पाटील यांची बेस्ट भवनात धाव

भांडुप परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नगरसेविका Rajol Patil यांनी कुलाबा येथील बेस्ट भवनात Trishna Vishwasrao यांची भेट घेत निवेदन सादर केले. अपघात ग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत अद्याप नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2026 | 06:32 PM
पाच महिने उलटूनही भांडुप बस अपघातग्रस्तांना अद्याप शासकीय मदत नाही! राजोल पाटील यांची बेस्ट भवनात धाव

पाच महिने उलटूनही भांडुप बस अपघातग्रस्तांना अद्याप शासकीय मदत नाही! राजोल पाटील यांची बेस्ट भवनात धाव

Follow Us
Close
Follow Us:
  • भांडुप बस अपघातग्रस्त कुटुंबांना अद्याप मदत नाही!
  • बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
  • सुरक्षिततेच्या उपाययोजना व नवीन बेस्ट बससेवेची मागणी
नीता परब, मुंबई : भांडुप परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नगरसेविका राजोल पाटील यांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांची कुलाबा येथील बेस्ट भवन येथे भेट घेत निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी भांडुप येथील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत तसेच नवीन बसेसची मागणी केली आहे .

या भेटीदरम्यान राजोल पाटील यांनी भांडुप परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली. विशेषतः वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अपुरी सुरक्षितता व नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Mumbai News: मुंबई विद्यापीठात मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षण! राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचा उपक्रम

अपघात ग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत अद्याप नाही

राजोल पाटील यांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना दिलेल्या पत्रात २९ डिसेंबर २०२५ रोजी भांडुप स्टेशन रोड परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघाताचा आवर्जून उल्लेख केला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून देत, संबंधित विभागामार्फत ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अपुऱ्या वाहतुकीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला

यावेळी राजोल पाटील यांनी भांडुपसह मुंबई उपनगरातील प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयीचाही मुद्दा उपस्थित केला. प्रवाशांची वाढती संख्या व अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवाशांच्या सोयीसाठी भांडुप, विक्रोळी, मुलुंड, घाटकोपर तसेच मुंबईतील विविध भागांसाठी बेस्ट बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली.

राजोल पाटील यांनी सांगितले की, भांडुपकरांच्या सुरक्षिततेचा व सोयी-सुविधांचा प्रश्न हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना व मृतांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत मिळावी, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी राजोल पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 

Web Title: Rajol patil meets best chairperson demand new buses bhandup accident help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.