Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut On Kangana Ranaut: ‘हीच इंदिरा गांधींची खरी ताकद..’; राऊतांनी कंगनाला आरसा दाखवला

खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2025 | 02:29 PM
Sanjay Raut On Kangana Ranaut: ‘हीच इंदिरा गांधींची खरी ताकद..’; राऊतांनी कंगनाला आरसा दाखवला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित इमर्जन्सी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पण  चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण केल्याचे आरोप होत आहेत. यावरून शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरातून कडाडून टीका करण्यात आली आहे.  “इंदिरा गांधी हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. पंडित नेहरू यांच्या पाठोपाठ आजच्या भारताची पायाभरणी इंदिरा गांधी यांनी केली. मात्र, कंगना रणौतने इंदिराजींना खलनायिका दाखवणारा इमर्जन्सी हा चित्रपट तयार केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. हीच इंदिरा गांधींची खरी ताकद आहे!” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हटलं आहे, सामनाच्या रोखठोकमध्ये

“कंगना राणावत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा `इमर्जन्सी’ हा चित्रपट काढला. बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद! कंगना राणावत हिचा `इमर्जन्सी’ हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरे झाले. खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. ”

`इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवले आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून-तोडून सादर केला आहे. इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे. भारताचा एक भाग असलेल्या मुंबईस (जी महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे) मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या कंगना राणावतसारख्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी इंदिरा गांधी यांनी तेव्हा आणीबाणी लावली हे सत्य आहे. राष्ट्रीय सुरक्षेची गरज म्हणून लावलेल्या आणीबाणीस 50 वर्षे होऊन गेली. तरीही काही लोक ती राख अंगाला फासून फिरत आहेत. पोलिसांनी व सैन्याने सरकारचे आदेश पाळू नयेत असे जयप्रकाश नारायण, चरणसिंगांसारखे नेते जाहीर सभांतून चिथावणी देत होते.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी व आणीबाणीचे समर्थन केले होते. तरीही भाजप व शिवसेना 25 वर्षे एकत्र नांदले, सत्ता भोगली त्याचे काय? इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करणारे असे चित्रपट व निर्मात्यांना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जाब विचारायला हवा. इंदिराजींचे नेतृत्व कणखर व पोलादी होते. देशातील आधारभूत परिवर्तनाच्या त्या नायिका होत्या. आजचा विकास म्हणजे इंदिराजींनी केलेल्या पायाभरणीचे फळ आहे. इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे एका झटक्यात बंद केले. “

Web Title: Sanjay raut criticizes kangana ranaut over the film emergency nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Kangana Ranaut

संबंधित बातम्या

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका
1

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती
2

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’
3

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’

‘तुम्ही आगीत आणखी तेल ओतलं…’ कंगना रणौतला सुप्रीम कोर्टाने फटकारलं; अभिनेत्री स्वतःच्याच जाळ्यात फसली
4

‘तुम्ही आगीत आणखी तेल ओतलं…’ कंगना रणौतला सुप्रीम कोर्टाने फटकारलं; अभिनेत्री स्वतःच्याच जाळ्यात फसली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.