मुबंई : आज न्यायालयाने नवाब मलिकांना २१ मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. आता आम्ही पार्टीचे नेते आणि कुटुंबातील लोकांसोबत बसून विचारविनिमय करुन पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ. आता बोलणे घाईचे ठरेल, ज्याप्रमाणे नेत्यांचे आणि वकिलांचे मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. ईडीने कोणाच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केली हे जगजाहीर आहे. असा घणाघात कप्तान मलिक यांनी केला.
[read_also content=”पाच वर्षापूर्वी BMC कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेला घोटाळा! कारवाईच्या भीतीने आमदार लाड यांची उच्च न्यायालयात धाव https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/scandal-in-bmc-contract-five-years-ago-fearing-action-mla-prasad-lad-ran-to-the-high-court-nrvk-250658.html”]
जेव्हा नवाब मलिक तुमच्यामध्ये येतील ते स्वत: याबाबतीत खुलासा करतील. असंही त्यांनी सांगितल. नवाब मलिक राष्ट्रवादी पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी गेल्या ४ महिन्यांत ज्याप्रकारे आपले बोलणे मांडले होते आणि त्यानंतर मलिक यांना ज्याप्रकारे २३ तारखेला नोटीस न बजावता चौकशीस नेले होते, हे मुंबई नाही महाराष्ट्र नाही तर पुर्ण भारत जाणतो. बाकी नवाब मलिक तुमच्यासमोर येतील तेव्हा सविस्तर बोलतीलच. मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज करणार का असे विचारले असता कप्तान मलिक म्हणाले की, आमचे वकील तसेच कुटुंबातील एक सदस्य देखील वकील आहेत. तर पुढे काय करायचं याचा निर्णय ते घेतील.
[read_also content=”ना झुकणार, ना माफ करणार, ना विसरणार, युक्रेनच्या राष्ट्पतींची स्पष्ट भूमिका, म्हणाले- शपथेवर सांगतो ज्यांनी युद्धात अत्याचार केले त्यांना सोडणार नाही https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/i-will-not-bow-down-i-will-not-forgive-i-will-not-forget-the-clear-role-of-the-president-of-ukraine-he-said-250619.html”]