Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या तापमानात होतीये घट; मुंबईसह उपनगरात किमान तापमान 14 अंश सेल्सिअसवर

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. सोमवारी हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रावर 19.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 17, 2024 | 02:32 PM
मुंबईच्या तापमानात होतीये घट; मुंबई उपनगरात किमान तापमान 14 अंश सेल्सिअसवर

मुंबईच्या तापमानात होतीये घट; मुंबई उपनगरात किमान तापमान 14 अंश सेल्सिअसवर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात दोन दिवसांपासून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा सामना करावा लागत आहे. असे असताना मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. त्या तुलनेत उपनगरात पारा अधिक घसरला असून, सोमवारी उपनगरात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस होते. त्यामुळे मुंबईचे किमान तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा : Delhi-NCR: हवेची गुणवत्ता खालावली! दिल्लीत पुन्हा GRAP-3 लागू; काय आहेत नवे निर्बंध

गेल्या आठवड्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले होते. मात्र, रविवारपासून त्यात घट होऊ लागली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. सोमवारी हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रावर 19.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.

तर उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट नोंदवण्यात आली. पुढील तीन ते चार दिवस तापमानात घसरण कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या काळात किमान तापमान 15 ते 16 अंशांच्या दरम्यान राहील. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता वाढल्याने राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून, राज्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईत वाढले प्रदूषण

मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषण वाढत आहे. सोमवारी मुंबईत सर्वाधिक प्रदूषण नेव्ही नगर-कुलाबा येथे झाले. तेथील हवा निर्देशांक 315 होता. मुंबईत एकीकडे थंडी वाढत असताना दुसरीकडे हवेचे प्रदूषणही वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी विकासकामे आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरत आहे.

काश्मीरसह जम्मूमध्येही कडाक्याची थंडी

काश्मीरसह जम्मूमध्येही कडाक्याची थंडी आहे. काश्मीरच्या सर्व भागात तापमान गोठणबिंदूच्या खाली कायम आहे. रविवारी रात्री श्रीनगर शहरातील तापमान उणे ३.४ अंश सेल्सिअस होते. रात्रीही पारा याच बिंदूवर होता. जम्मूमध्येही किमान तापमान पाच अंशांवर राहिले. मात्र, जम्मूमध्ये दिवसभर उन्हामुळे थोडासा दिलासा मिळाला.

दार्जिलिंगमध्येही तापमानात होतीये घट

बुधवारी (दि. 17) दार्जिलिंगमधील हवामानात बदल दिसून आला आहे. यामध्ये भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, १६.०°C कमाल आणि ८.०°C किमान तापमान पाहिला मिळाले. 93 च्या AQI रीडिंगसह हवा बऱ्यापैकी स्वच्छ दिसून आली. परंतु, दार्जिलिंग आज दाट धुक्यात बुडाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

हेदेखील वाचा : 2025 च्या जगातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर; जाणून घ्या या 8 महान शक्तींमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे

Web Title: Mumbais temperature is dropping continuously nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • Weather Update

संबंधित बातम्या

नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…
1

नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.