मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला. महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठे असे यश मिळाले आहे. मात्र महावीकस आघाडीकहा झालेला पराभव त्यांचे नेते अजूनही स्वीकारताना दिसत नाहीयेत. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएम मशीनविरुद्ध आवाज उठवत आहेत. ईव्हीएमम मशीन आणि मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप महावीकस आघाडी करत आहे. दरम्यान आता ही लढाई कोर्टात जाऊन लढण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. त्यामुळे आता ईव्हीएमविरुद्धची लढाई कोर्टात लढली जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचे नेते आता हायकोर्टात धाव घेणार आहेत. दरम्यान या आधी देखील अनेक याचिका ईव्हीएमविरुद्ध हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीबाबत विरोधातील याचिका पहिल्यांदाच दाखल होणार आहेत. निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर आणि धर्माच्या आधारे मत मागण्यात आली असा आरोप या याचिकेतून करण्यात आले आहे. या संदर्भात काही पुरावे देखील याचिकेतून जोडण्यात आल्याचे समजते आहे. मात्र निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक होणे किंवा त्यात फेरबदल होणे अशा गोष्टी पूर्णपणे नाकारल्या आहेत.
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतील प्रचंड असे यश प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीला 50 जागा पण पार करता आलेल्या नाहीयेत. त्यामुळे महाविकास आघाडीने ईव्हीएमविरुद्ध आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध जनमत असताना विधानसभा निवडणुकीत इथे मोठे यश किंवा जागा जिंकणे कसे शक्य आहे असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून केला जात आहे. मात्र त्याच वेळी महायुतीकडून देखील महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रात पराभव झाला तर ईव्हीएम वाईट आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडी जिंकली तर ईव्हीएम चांगले अशा प्रकरे महाविकास आघाडीवर देखील टीका केली जात आहे.
“धूल चेहरे पे थी, आइना साफ़…”; फडणवीसांचा ‘मविआ’ला जोरदार चिमटा
राज्यात महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये राज्यातील जनतेने महायुती सरकारला संपूर्ण बहुमत दिले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांना झालेला पराभव, ईव्हीएम आणि अनेक गोष्टींवरून टोले लगावले.
हेही वाचा: Devendra Fadnavis: “धूल चेहरे पे थी, आइना साफ़…”; फडणवीसांचा ‘मविआ’ला जोरदार चिमटा
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना विधानसभेत फडणवीस म्हणाले, “विरोधकांनी जनतेने दिलेला निकाल खुल्या मनाने स्वीकारावा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तोवर तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील.” यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेरोशायरी करत विरोधकाना टोला लगावला. ‘उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आइना साफ़ करता रहा’,अशा ओळी विधानसभेत ऐकवत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.