तुम्ही पण एक दिवस मुख्यमंत्री होणार'; खुद्द CM देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा
Nagpur Winter Session 2024: राज्यात महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये राज्यातील जनतेने महायुती सरकारला संपूर्ण बहुमत दिले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांना झालेला पराभव, ईव्हीएम आणि अनेक गोष्टींवरून टोले लगावले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. तसेच शेवटच्या काही वेळात मतदानाची आकडेवारी वाढली असा आरोप केला आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी विरोधक करत आहेत. या सर्व आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना विधानसभेत फडणवीस म्हणाले, “विरोधकांनी जनतेने दिलेला निकाल खुल्या मनाने स्वीकारावा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तोवर तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील.” यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेरोशायरी करत विरोधकाना टोला लगावला आहे.
LIVE | Replying in Legislative Assembly to discussion on Hon Governor’s address..
मा. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर…🕝 2.30pm | 19-12-2024📍 Vidhan Bhavan, Nagpur.#Maharashtra #Nagpur #WinterSession2024 https://t.co/WDF4S4y78N
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2024
‘उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आइना साफ़ करता रहा’,अशा ओळी विधानसभेत ऐकवत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा साफ करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी खोचक टोला लगावला.
मोकळ्या मनाने जनादेश स्वीकारावा – फडणवीस
निकाल आपल्या बाजूने आला की सर्व काही चांगले. विरोधात निकाल आला तर ईव्हीएमवर आरोप करायचे. ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते. मात्र तिथे सिद्ध करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष गेला नाही. त्यामुळे जनतेने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा. आम्ही तो लोकसभेत स्वीकारला, त्यावर काम केले. आम्ही ईव्हीएमवर खापर फोडले नाही. फेक नरेटीव्हमुळे आम्ही हरलो.
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे नवीन संकेतस्थळ
महाराष्ट्र राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. 17 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथील विधानभवनातील समिती सभागृहामध्ये अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे.