Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नात मिळालेल्या दागिन्यांवर पतीचा हक्क नाही; घटस्फोटानंतर पत्नीला सर्व ‘स्त्रीधन’ परत द्या; हायकोर्टाचा आदेश

लग्नाच्या अवघ्या काही आठवड्यांत सुरू झालेला वाद घटस्फोटानंतरही संपला नाही. सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि लग्नातील भेटवस्तूंवरून सुरू झालेल्या वादात हायकोर्टाने दिलेला निर्णय आता चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 09, 2026 | 03:03 PM
लग्नात मिळालेल्या दागिन्यांवर पतीचा हक्क नाही; घटस्फोटानंतर पत्नीला सर्व ‘स्त्रीधन’ परत द्या; हायकोर्टाचा आदेश

लग्नात मिळालेल्या दागिन्यांवर पतीचा हक्क नाही; घटस्फोटानंतर पत्नीला सर्व ‘स्त्रीधन’ परत द्या; हायकोर्टाचा आदेश

Follow Us
Follow Us:
  • लग्नात मिळालेले स्त्रीधन पत्नीचेच न्यायालयाने केले स्पष्ट
  • न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली
  • दागिन्यांसह रोख रक्कम परत करण्याचे दिले आदेश
नागपूर: लग्नानंतर अवघ्या काही आठवड्यांत पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला. सिकंदराबाद येथील नवीन आणि नागपूर येथील करिना यांचा विवाह २९ नोव्हेंबर २००८ रोजी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. १६ डिसेंबर २००८ रोजी करिना माहेरी गेली. यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. मात्र, लग्नावेळी मिळालेल्या दागिन्यांसह इतर वस्तू आणि रोख रक्कम परत करण्यावरून वाद कायम राहिला.

कौटुंबिक न्यायालयाचा आदेश

या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निर्णय देत तिला लग्नावेळी मिळालेल्या भेटवस्तू, सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख परत करण्याचा आदेश दिला. या निर्णयाला पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. या अपीलावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने पतीचे अपील फेटाळून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

‘स्त्रीधन’वर पत्नीचा अधिकार

सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर लग्नाच्या खर्चासह विविध बाबींची माहिती आली. वधूच्या वडिलांनी मंडप, भोजन आणि भेटवस्तूंचा खर्च केल्याचेही समोर आले. तसेच, उलटतपासणीदरम्यान पतीने सोन्याची अंगठी, सूट, महागडे घड्याळ, मोबाईल आणि रोख रक्कम स्वीकारल्याचे मान्य केले होते. या पुराव्यांचा विचार करून कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले.

हेही वाचा: Pune: दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; आई-वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण

दागिने, रोख रक्कम आणि भेटवस्तू परत करण्याचे आदेश

न्यायालयाने स्पष्ट केले की, विवाहावेळी महिलेला मिळालेले ‘स्त्रीधन’ हे तिच्या हक्काचे असते. त्यावर पती किंवा सासरच्या मंडळींचा स्वतंत्र मालकी हक्क निर्माण होत नाही. त्यामुळे संबंधित स्त्रीधन तातडीने पत्नीला परत करणे आवश्यक आहे. नागपूर खंडपीठाने पतीची याचिका फेटाळत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि भेटवस्तू पत्नीला परत करण्याचा आदेश कायम ठेवला.

काय असते ‘स्त्रीधन’?

साधारणपणे विवाहापूर्वी, विवाहावेळी किंवा विवाहानंतर महिलेला तिच्या नावाने किंवा तिच्यासाठी मिळालेल्या दागिने, रोख रक्कम, कपडे, भेटवस्तू, मालमत्ता आदींचा ‘स्त्रीधन’मध्ये समावेश होऊ शकतो. घटस्फोट झाला तरी स्त्रीधनावरील महिलेचा हक्क संपत नाही.

चौकट : या प्रकरणातील महत्त्वाचे आकडे

विवाह: २९ नोव्हेंबर २००८
पत्नी माहेरी गेली: १६ डिसेंबर २००८
कौटुंबिक न्यायालयाचा आदेश: स्त्रीधन परत करण्याचे निर्देश
रोख रक्कम: ४०,०००
न्यायालय: मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ
निर्णय: पतीचे अपील फेटाळले

Web Title: A husband has no right to jewelry received at the wedding high court orders return of all stridhan to the wife after divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.