A. who collects garbage in Nagpur. G. Action on Enviro and BVG companies, what is the reason?
नागपूर : शहरातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लागण हे नागरिकांच्या आरोग्यासाठी फारच आवश्यक असत. यासाठीच नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) ए. जी. एन्व्हायरो आणि बी.व्ही.जी. (A. G. Enviro and B.V.G.) या दोन कंपन्यांना याची जबाबदारी दिली आहे. त्यांच्याशी झालेल्या करारानुसार या दोन्ही कंपन्या शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन आणि परिवहन करण्याच्या कामात हयगय करीत असल्याचे आढळून आले आहे. तर, या कंपन्यांचे करार रद्द करून तीन महिन्यांत नवीन एजन्सी नियुक्त करण्यात यावी, असे निष्कर्ष चौकशी समितीने दिले आहेत. या आधारावर दोन्ही कंपन्यांच्या करारानुसार कायदेशीर कारवाई व्हावी या दृष्टीने चौकशी समितीने अहवाल दिलेला आहे. या अहवालावर सिनियर कौन्सिलरचे मत घ्यावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी दिले. शनिवारी मनपा मुख्यालयातील पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात कचरा संकलनासाठी मनपाद्वारे सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली.
[read_also content=”नागपुरात दुमजली इमारतीवरून गेला तोल अन्… १२ वर्षीय मुलाच्या परिवारावर ओढवला दुःखाचा डोंगर https://www.navarashtra.com/latest-news/in-nagpur-a-12-year-old-boys-family-was-hit-by-a-mountain-of-grief-229597.html”]
यावेळी, महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, संबंधित कंपन्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. यासाठी समितीच्या अहवालावर सिनियर कौन्सिलरचे मत घेऊन पुढील कारवाई सुरु करावी. तर, सल्लागाराकडून निश्चित कालावधी सुद्धा ठरविण्यात यावा. तसेच वरिष्ठ सल्लागाराकडे समितीच्या अहवाल तसेच, समितीने सात महिन्यांत घेतलेल्या बैठकांचे अहवाल देखील सादर करावे असे, महापौर तिवारी यांनी सांगितले. तर,या अहवालावर सत्तापक्ष, विरोधी पक्षाने सकारात्मक मत व्यक्त केले. स्वच्छता हा नागरिकांच्या आरोग्याचा आणि शहराच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. कोणत्याही कंपनीला काम दिल्यानंतर ते काम त्या कंपनीकडून करवून घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, मनपा प्रशासन आपली जबाबदारी पार पडण्यास कमी पडलं आहे.
[read_also content=”उमरेडच्या अश्लिल नृत्य प्रकरणात ब्राम्हणी येथील उपसरपंचास अटक, पुन्हा आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/sub-panch-arrested-at-bramhani-in-umreds-obscene-dance-case-number-of-accused-likely-to-increase-again-nraa-228925.html”]
एजी आणि बीव्हीजी कंपन्यांना एक संधी दिली पाहिजे या आयुक्तांच्या वक्तव्यावर अविनाश ठाकरे म्हणाले, दोन्ही कंपन्यांना कामात सुधारणा करण्यासाठी गेली सात महिने होती. मात्र या सात महिन्यांत कोणतीही सुधारणा केली नाही. सर्व नगरसेवकांना कचरा संकलनाबाबबत नकारात्मक मत आहे. ही वस्तुस्थिती आहे. ते म्हणाले, प्रशासनाने संपूर्ण अहवालाचे वाचन केले असते तर त्यांनी कंपन्यांबाबत अशा प्रकारे आपले मत व्यक्त केले नसते. समितीच्या सदस्यांनी चौकशी केली असता कंपन्यांबद्दलचे अनुभव खूप वाईट ऐकायला मिळाले आहे. समितीतर्फे दिलेल्या अहवालावर आम्ही कायम असल्याचे मत चौकशी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.