Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रशेखर बावनकुळेंना सहा वर्षांनंतर मिळाला नागपूरच्या पालकमंत्रिपदाचा पदभार

नागपूर जिल्हा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असल्याने त्यांच्याशिवाय दुसरे नाव नव्हते. अपेक्षेप्रमाणे त्यांचे नाव जाहीर झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 19, 2025 | 03:28 PM
राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे.

राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे.

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे नागपूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे शेजारच्या अमरावती जिल्ह्याचेही पालकत्व असेल. सहा वर्षानंतर बावनकुळे हे पुन्हा नागपूरचे पालकमंत्री झाले आहेत. 2014 ते 2019 या पाच वर्षाचा काळात ते नागपूरचे पालकमंत्री होते. त्यांच्याकडे पालकमंत्री येण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले व राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यानंतर चौथ्या क्रमांकाचे वजनदार मंत्री असलेले बावनकुळे यांच्याकडे महसूलसारखे मोठे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविले. लोकसभेत पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत फडणवीसांना साथ देत अवघे राज्य पिंजून काढले होते. पक्षाला मोठे यश मिळाले. त्यामुळे त्यांच्याकडे मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी येणार असे मानले जात होते.

अमरावतीचीही जबाबदारी

अमरावती जिल्हयातून मंत्रिमंडळात कुणाचाही समावेश नाही. त्यामुळे अमरावतीचे पालकमंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी वऱ्हाड प्रांतात मोठा दांडगा जनसंपर्क निर्माण केला. महसूल मंत्री म्हणूनही प्रशासनावर ते नजर ठेवून विकासकामांना गती देतील, अशी अपेक्षा अमरावतीकरांना आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्यापेक्षा अनुभवी मंत्री

राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्यापेक्षा अनुभवी मंत्री असतानाही फडणवीस यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देत महसूलसारखे मोठे खाते दिले. यापूर्वी ऊर्जामंत्री असतानाही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. प्रशासनावर वचक असणारा आणि कायम कामात व्यस्त असणारे मंत्री म्हणून बावनकुळेंची ओळख आहे.

नागपूर जिल्हा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असल्याने त्यांच्याशिवाय दुसरे नाव नव्हते. अपेक्षेप्रमाणे त्यांचे नाव जाहीर झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. 2014 ते 2019 मध्ये बावनकुळे यांनी पालकमंत्री म्हणून जोरदार बॅटींग केली होती. प्रशासनाला कामाला लावले होते.

जयस्वाल गडचिरोलीचे सहपालकमंत्री

वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख असतानाही गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवले. यापुवींच त्यांनी तसे संकेत दिले होते. परंतु, कामाच्या व्यापामुळे दुर्लक्ष होऊ नये म्हणून जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्री हे कुठल्याही जिल्हयाचे पालकमंत्री राहत नाही. मात्र, ही परंपरा फडणवीस यांनी खंडीत केली. नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्हयाला विकासाच्या रांगेत अग्रक्रमी करण्यासाठीची त्यांची धडपड यानिमित्ताने पुढे आली आहे.

Web Title: Chandrashekhar bawankule takes charge of nagpur guardian minister nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Indian Political News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘भाजप हायकमांड निर्णय…’
1

Maharashtra Politics : शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘भाजप हायकमांड निर्णय…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.