कर्नाटकमध्ये कॉँग्रेसने एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. कॉँग्रेसच्या आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासह कॉँग्रेसपक्षावर टीकेची झोड उठली आहे.
जर एखाद्या नेत्याला राजकारणाच्या बुद्धिबळावर पाऊल टाकायचे असेल तर त्याला फसवे बनावे लागते. कोट्यवधींची संपत्ती जमवूनही स्वतःला साधे लोकसेवक म्हणवणाऱ्या नेत्यांची कमतरता नाही.
यंदाच्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पक्षाचा नियम पाळून मोदी निवृत्त होणार की, आपला कार्यकाळ सुरूच ठेवणार असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चांना उधाण आले असून टीका केली जात आहे.
तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील ACRCC ने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. चेन्नईत झालेल्या उच्च स्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान, नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल म्हणाले की, भारतात दहशतवाद नवीन नाही. तो काँग्रेसच्या काळातही होता आणि भाजपच्या काळातही आहे, नव्या वादाला तोंड फुटले
'रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही' या पंतप्रधान मोदींच्या विधानावर ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला आणि विचारले की जेव्हा पाकिस्तानसोबत व्यापार आणि पाणी थांबवले, तर क्रिकेट सामने कसे खेळले…
दिवंगत रामविलास पासवान यांना भारतरत्न देण्याची मागणीही पशुपती पारस यांनी केली. त्यांचा पक्ष 243 जागांवर सदस्यता मोहीम सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नवीन अध्यक्षांच्या घोषणेनंतर राष्ट्रीय परिषद आणि कार्यकारिणीत महिलांना 33 टक्क्यांपर्यंत जागा देण्याची योजना आहे. संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल.
नाशिकचेही पालकमंत्रिपद हवे शिंदे गटाला नाशिकचेही पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला हवे आहे. नाशिकसाठी शिंदे गटाचे दादा भुसे इच्छुक आहेत. या नाराजी नाट्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती.
तेलुगु देसम पक्षातून सावधपणे अस्वस्थता व्यक्त होत आहे. पक्षाच्या काही नेत्यांनी विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप नोंदवला असला तरी चंद्राबाबू नायडूंनी आमच्या शंकांचे निरसन होईल, असा शब्द दिल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 6 व्या क्रमांकावर स्थिर आहेत. गेल्यावर्षीच्या यादीतही तिघे याच स्थानी होते.
चार पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडल्याने राऊत यांनी कायमचे बडतर्फही केले होते. तर, पुढील निवडणूक लढवायची असल्याने कुरघोडी करीत शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयर, केतन ठाकरे यांना हटविल्याचीही चर्चा आहे.
बिहारमधील सुमारे 2 कोटी लोक रोजगारासाठी देशभरात स्थायिक झाले आहेत. यापैकी 1.3 कोटी लोकांची मते बिहारमध्ये आहेत. आताही ते मतदार आहेत आणि बऱ्याचदा ते मतदान करायला जात नाहीत.
न्यायालयाने दिल्ली पोलिसांना १८ मार्च रोजी या प्रकरणी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात केजरीवाल आणि इतर पक्ष नेत्यांविरुद्ध सरकारी निधीच्या गैरवापराचा खटला चालवणे योग्य असल्याचे म्हटले.
बसपच्या प्रमुख मायावती यांनी धक्कादायक निर्णय घेत त्यांचा पुतण्या आकाश आनंदची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आकाश यांना पक्षातून काढून टाकण्यामागे त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ असल्याचं कारण सांगितलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकांत तर काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.