पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल (Photo - X)
नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी वारंवार सांगतो की, भाजप शेतकरीविरोधी आहे. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पुरावे देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वस्तुस्थिती समजू लागली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. काल सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी अॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाच हजार रुपयांत नेमकं काय होणार, हे सांगता येत नाही. किमान वीस हजार रुपये तरी दिवाळी अॅडव्हान्स म्हणून दिले असते, तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळाला असता’, असे त्यांनी सांगितले.
तसेच सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. खतांच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. शेतकऱ्यांची लूट करणारं हे सरकार आहे, हे देशासमोर दिसत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
देशद्रोही म्हणजे नेमकं कोण?
देशात जनतेला, इम्रान खान, नाईक यांना किंवा सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवायचं की नाही, हे सरकारमध्ये बसलेले लोक ठरवतात. देशद्रोही म्हणजे नेमकं कोण? माझा आरोप आहे की, एसआयआरच्या नावाखाली देशातील ३२ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. लोकांचं व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे. जे लोक देशाचं संविधान मानत नाहीत, असे लोक संविधानिक पदांवर बसले आहेत. अशा लोकांना देशद्रोही म्हणायचं का?
…तर ही हुकूमशाहीच आहे
आंदोलन करण्यासाठी पैसे भरावे लागतात. आपलं मत मांडण्यासाठीही पैसे द्यावे लागत असतील, तर ही हुकूमशाहीच आहे. देशात आपलं मत मांडण्याचा अधिकार नसेल, तर नरेंद्र मोदी यांचं सरकार हुकूमशाही चालवत आहे, असंच म्हणावं लागेल.
बच्चू कडू यांचे पदवीधर मतदारसंघाबाबतच्या विधानावर म्हणाले…
मला त्या विषयावर बोलायचं नाही. कोण कसं बोलतं, यावर मला विधान करायचं नाही. लोकांच्या आशीर्वादाने आणि आमच्या कामाच्या जोरावर आम्हाला निवडून द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. उमेदवार लोकांपर्यंत जात आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे होत असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची आगाऊ आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, रक्कम जमा होण्याची निश्चित तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
Ans: दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, लाभार्थी निश्चितीचे सविस्तर निकष अधिकृत शासन निर्णयानुसार स्पष्ट होतील.
Ans: महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर आणखी ४० तालुक्यांचा समावेश केल्याने एकूण ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.






