भारतीय सैन्यदलाने केलेली मागणी पूर्ण करत त्यांना शिवसेनेच्या वतीने ५० कंटेनर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यातील ४६ कंटेनर यापूर्वीच सीमेवर रवाना करण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणारा भाजप स्वतःच काँग्रेसमय झाल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून विविध पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. याचपार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रचारासंबंधी विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
२०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील युवकांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Fake Certificate Scam Maharashtra: यवतमाळमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. १३०० लोकसंख्या असलेल्या गावातून २७००० दाखले देण्यात आले आहेत.
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील हे सुंदर हिल स्टेशन “भारताचं इटली” म्हणून ओळखलं जातं. रंगीबेरंगी इमारती, तलाव, हिरवीगार डोंगररांग आणि युरोपियन शैलीमुळे इथे गेल्यावर परदेशात असल्यासारखं वाटतं.
चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ आली.भोवळ आल्याने राणेंनी कार्यक्रम आटोपता घेतला.या कार्यक्रमाला नारायण राणेंच्या पत्नी निलम राणेही उपस्थित होत्या.
राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायल मिळत आहे. तर दुसरीकडे देवरुखमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे पोस्टर जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एचएसआरपी संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत असून, जुन्या गाड्यांना 'एचएसआरपी' लावण्यासाठी नवा कंत्राटदार शोधण्यासाठी परिवहन आयुक्तालय पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन करीत आहे.
आदित्य आणि अमित ठाकरेंनी वर्कशॉपमध्ये सादर केलेल्या घोषणांची माजी खासदार शेवाळे यांनी पोलखोल केली. पालकांनी युवराजांना थोडं समजावून आणि अभ्यास करुन वर्कशॉपसाठी पाठवायला हवं होतं, असा टोला शेवाळे यांनी उबाठाला…
चिखलदऱ्यात (अमरावती) देशातील पहिला आणि जगातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक तयार होत आहे, जो सुमारे ४०७ मीटर लांब असून ५०० पर्यटकांची क्षमता ठेवतो, तो लवकरच पर्यटकांसाठी खुला होईल, अशी शक्यता…
महाराष्ट्राच्या लाडकी योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. सरकारकडून आता योजनेला चाळणी लावण्यात आली असून ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे.
Weather Update : नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थंडी कमी होण्याची शक्यता, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांची व्यक्त केली आहे. तसेच कोणत्या राज्यात किती अंश तापमान असणार आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून…
मंगेश काळोखे हत्या प्रकरणात सोशल मीडियावरुन बदनामी केली जात असल्याचा आरोप केला. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर मागील 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याची भूमिका…
भविष्यात धाराशिव विमानतळ प्रादेशिक हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र (Regional Hub) म्हणून उभे राहील, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जगभरात जेन झी चळवळ फोफावते आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिद्धी वखे यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ऐतिहासिक विजय मिळवून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून शहरातील सर्व दहा निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.