मुंबई : सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांवरुन राजकारण तापले आहे, तसेच अतिवृष्टीमुळं राज्यातील (State flood) अनेक भागात मोठी हानी झाली असून, शेतकऱ्यांचे (farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे विदर्भ (Vidharbha) दौरा करणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) हे सुद्धा १९ सप्टेंबरला सोलापूर व विदर्भ दौरा करणार आहेत.
[read_also content=”मला राजकारणात जायचं नाही पण आमच्याकडून सर्व ऑफर कंपनीला दिल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर https://www.navarashtra.com/maharashtra/we-all-offer-gave-to-vedanta-foxconn-company-cm-eknath-shinde-325839.html”]
दरम्यान, यावर्षी मुसळधार पावसामुळं तसेच अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती, घरांचे, बागांचे आदीचे पावसामुळं मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी तसेच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा १९ सप्टेंबरला विदर्भ दौरा करणार आहेत. तसेच माढा तालुक्याचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या कुर्डूवाडी येथील माढा तालुका पंचायत समितीच्या आवारातील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा हा गेल्या कित्येक महिन्यांपासून शरद पवार यांच्या वेळेअभावी रखडला होता. अखेर १९ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. शरद पवार हे सोलापूरनंतर विदर्भाचा दौरा करणार आहेत.