Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तर जनता चपलेने मारेल’; पक्षांतराच्या चर्चांवर बजरंग सोनावणे स्षष्टच बोलले

शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 12, 2024 | 02:24 PM
तर जनता चपलेने मारेल’; पक्षांतराच्या चर्चांवर बजरंग सोनावणे स्षष्टच बोलले
Follow Us
Close
Follow Us:

बीड : लोकसभा निवडणुकीमध्ये बीड मतदारसंघातून विजयी झालेले शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अजित पवार गटाचे प्रवेक्ते अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. त्याचबरोबर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे निकालानंतर लगेचच शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार अजित पवार गटात जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर आता बजरंग सोनावणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले बजरंग सोनावणे?

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना खासदार बजरंग सोनावणे म्हणाले, “अमोल मिटकरी कोण आहेत? अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? अमोल मिटकरी कोण आहेत हेच मला माहिती नाही. अजित पवारांच्या बंगल्यावर ऑपरेटर म्हणून एखादे अमोल मिटकरी असतील. त्यामुळे अजित पवारांना दिवसभरात किती आणि कोणाचे फोन येतात, याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे असेल. मात्र, अमोल मिटकरी कोण आहेत हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तसेच त्यांचा बोलवता धनी कोण? हेही मिटकरींनी सांगितलं पाहिजे”, अशी खोचक टीका बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरींवर केली.

अमोल मिटकरी यांचे ट्वीट

बीडच्या बप्पाचा दादांना फोन #मोठ्यामनाचादादा

— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 11, 2024

पुढे सोनावणे म्हणाले,“अमोल मिटकरींनी ट्विटमध्ये काय म्हटलं? शरद पवारांचा एक खासदार अजित पवारांच्या संपर्कात आणि लवकरच काय ते कळेल. आता मला एक सांगा.  बीड जिल्ह्यातील जनतेनं माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे. त्यामधून कितीही उतराई करण्याचा प्रयत्न केला तरी मी कमी पडेल. माझ्या मनात काही असतं आणि मी माझ्या बंगल्याच्या बाहेर वेगळा विचार करून गेलो तर बीड जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलेने फोडेल. ते जाऊद्या मी शरद पवारांना सोडायचं म्हटलं तरी माझे वडील माझ्या कानशि‍लात लगावलीत आणि माझी बायको म्हणेल की तुम्हाला खायलाही मिळणार नाही, नाश्तादेखील नाही, अशी परिस्थिती होईल”, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली.

Web Title: Ncp sharad pawar groupbeed mp bajrang sonwane react on entry in ajit pawar group maharashtra politics nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 02:24 PM

Topics:  

  • Sharad Pawar Group

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?
1

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?

Eknath Khadse : नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
2

Eknath Khadse : नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.