Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maternal healthcare: राज्यात मातृ-बाल आरोग्यात मोठी प्रगती! राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून सकारात्मक चित्र समोर

Maternal Health: सर्वेक्षणानुसार, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत तपासणी करून घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. तसेच बहुतांश महिलांनी किमान एकदा तरी प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी केली असून नियमित तपासणीचे प्रमाणही वाढले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 09, 2026 | 05:45 PM
Maternal Health, Child Care, NFHS6, Maharashtra Healthcare, Pune Health,

Maternal Health, Child Care, NFHS6, Maharashtra Healthcare, Pune Health,

Follow Us
Follow Us:
  • आरोग्य सेवांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्येत वाढ
  • गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत तपासणी करून घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले
  • गर्भधारणेदरम्यान लोह-फॉलिक आम्लाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले
Maternal and child healthcare News: गर्भधारणेदरम्यान तपासणी करून घेणाऱ्या, आवश्यक पोषण घेणाऱ्या आणि आरोग्य सेवांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या राज्यात वाढत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६ (२०२३-२४) मधून समोर आले आहे. मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत गर्भधारणेची नोंदणी, प्रसूतीपूर्व तपासणी आणि लोह-फॉलिक आम्ल सेवन या बाबींमध्ये सुधारणा दिसून आली आहे.

सर्वेक्षणानुसार, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत तपासणी करून घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. तसेच बहुतांश महिलांनी किमान एकदा तरी प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी केली असून नियमित तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळाच्या आरोग्यावर अधिक लक्ष देता येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट! नगरसेवक सुनील पांडेंनी केली चिंता व्यक्त; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी

पोषणाच्या बाबतीतही सकारात्मक चित्र दिसून आले आहे. गर्भधारणेदरम्यान लोह-फॉलिक आम्लाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले असून यामुळे रक्तक्षय कमी करण्यास मदत होत असल्याचे मानले जाते. नवजात बालकांना टिटॅनसपासून संरक्षण मिळण्याचे प्रमाणही वाढले आहे.

तसेच नोंदणीकृत गर्भधारणांमध्ये माता व बाल संरक्षण (एमसीपी) कार्ड मिळालेल्या महिलांचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेचा महिलांशी संपर्क वाढल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार शहरी भागात काही निर्देशांक अधिक चांगले असले तरी ग्रामीण भागातही आरोग्य सेवांचा विस्तार होत असल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६ विरुद्ध सर्वेक्षण-५ (एकूण आकडेवारी)

निर्देशांक – सर्वेक्षण-५ – सर्वेक्षण-६

पहिल्या तीन महिन्यांत प्रसूतीपूर्व तपासणी. – ७०.९% – ८५.४%

किमान एक प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी – ९१.६% – ९५.५%

किमान चार प्रसूतीपूर्व आरोग्य भेटी – ७१.४% – ७७.५%

१०० दिवस लोह-फॉलिक आम्ल गोळ्यांचे सेवन – ४८.२% – ७१.२%

१८० दिवस लोह-फॉलिक आम्ल गोळ्यांचे सेवन – ३०.९% – ५२.३%

माता व बाल संरक्षण (एमसीपी) कार्ड प्राप्त गर्भधारणा – ९५.५% – ९७.५%

CJP Maharashtra Protest: पुण्यातील किती कॉकरोचेस सहभागी होणार?; CJPच्या महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा

‘मातृ आणि बाल आरोग्य क्षेत्रासाठी ही आकडेवारी सकारात्मक आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात तपासणी करून घेणाऱ्या महिलांची संख्या वाढणे आणि नियमित प्रसूतीपूर्व भेटी होणे हे चांगले लक्षण आहे. लोह-फॉलिक आम्ल सेवनात झालेली वाढ मातांमधील रक्तक्षय कमी करण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, प्रत्येक गर्भवती महिलेपर्यंत या सेवांचा दर्जेदार लाभ पोहोचण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात जागरूकता आणि फॉलोअप वाढविण्याची गरज आहे.’

-डॉ. मीरा शिंदे, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ

 

 

 

Web Title: Nfhs 6 maharashtra health survey 2026 maternal and child healthcare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.