Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता नव्या लालपरीतून प्रवास होणार आणखी सुखद; बसमध्ये बिघाड झाल्यास…

तसेच या बसच्या आगमनामुळे जुन्या बसमधील वारंवार बिघाड होण्याच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. नव्या बसच्या डिझाईनमध्ये प्रवाशांच्या आरामाला आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे,

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2025 | 08:49 AM
आता नव्या लालपरीतून प्रवास होणार आणखी सुखद; बसमध्ये बिघाड झाल्यास...

आता नव्या लालपरीतून प्रवास होणार आणखी सुखद; बसमध्ये बिघाड झाल्यास...

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात तब्बल १५ वर्षानंतर ३ बाय २ आसन व्यवस्थेसह ३००० नवीन, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि आरामदायी बस खरेदी करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. या नव्या लालपरीच्या आगमनाने प्रवासाचा अनुभव डिजिटल आणि सुखकर होणार आहे.

एसटी विभागाला आतापर्यंत अशा बस प्राप्त झाल्या असून, येत्या काळात आणखी बस मिळण्याची शक्यता आहे. या बसमध्ये डिजिटल डॅशबोर्ड, सेन्सरयुक्त इंजिन, कॅमेरे, चार्जिंग पोर्ट्स आणि संगणक प्रणालीद्वारे बिघाड शोधण्याची सुविधा आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत ३००० नवीन बस खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या बस थेट कंपनीकडून पूर्णपणे तयार केल्या जात असून, जुन्या पद्धतीप्रमाणे चेसिसवर बांधणी करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा बस महामंडळाला पुरवल्या जात आहेत.

हेदेखील वाचा : St Bus : नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

तसेच या बसच्या आगमनामुळे जुन्या बसमधील वारंवार बिघाड होण्याच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. नव्या बसच्या डिझाईनमध्ये प्रवाशांच्या आरामाला आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.

3 बाय 2 आसन व्यवस्था

नव्या बसची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यांची ३ बाय २ आसन व्यवस्था, गेल्या १५ वर्षांनंतर एसटी महामंडळाने पुन्हा एकदा या रचनेचा अवलंब केला आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता, ही आसन व्यवस्था अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. या रचनेमुळे बसची प्रवासी क्षमता वाढली असून, गर्दीच्या वेळी प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळण्याची शक्यता वाढली आहे. आसनांची रचना आरामदायी असून, प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासातही थकवा जाणवणार नाही.

तांत्रिक प्रगती आणि डिजिटल सुविधा

या नव्या बस तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. त्यामध्ये डिजिटल डॅशबोर्ड, सेन्सरयुक्त इंजिन आणि संगणक प्रणालीद्वारे बिघाड शोधण्याची सुविधा आहे. ज्यामळे बसमधील कोणताही तांत्रिक बिघाड थेट संगणक प्रणालीवर नोंदवला जातो, ज्यामुळे वेळेत दुरुस्ती करणे शक्य होते. यामुळे प्रवासातील विलंब टाळता येणार आहे आणि प्रवाशांना निर्धारित वेळेत गंतव्यस्थानी पोहोचता येईल.

Web Title: Now the journey will be even more pleasant with the new st bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • Maharashtra Transport

संबंधित बातम्या

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बनतेय बिकट; एसटी कामगारांच्या वेतनामधूनही केली जातेय कपात
1

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बनतेय बिकट; एसटी कामगारांच्या वेतनामधूनही केली जातेय कपात

पंढरीच्या वारीत एसटी झाली ‘मालामाल’; महामंडळाला मिळाले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न
2

पंढरीच्या वारीत एसटी झाली ‘मालामाल’; महामंडळाला मिळाले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न

विठुराय अन् भाविकांमध्ये ST ठरली दूत; तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांनी केला प्रवास, मंत्री सरनाईकांची माहिती
3

विठुराय अन् भाविकांमध्ये ST ठरली दूत; तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांनी केला प्रवास, मंत्री सरनाईकांची माहिती

सातारा बसस्थानकाचा कायापालट होणार; पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच सुरुवात
4

सातारा बसस्थानकाचा कायापालट होणार; पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.