Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरुळी कांचनमध्ये कार अपघात; कालव्यात कार पडून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

जेजुरी राज्य मार्गाजवळ कालव्याचा लोखंडी कठडा तोडून एक चारचाकी पाण्यात पडली असून, या घटनेत एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 23, 2024 | 04:47 PM
उरुळी कांचनमध्ये कार अपघात; कालव्यात कार पडून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
Follow Us
Close
Follow Us:
उरुळी कांचन : जेजुरी राज्य मार्गावरील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत नव्या कालव्याचा लोखंडी कठडा तोडून एक चारचाकी पाण्यात पडली असून, या घटनेत एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर तिघेजण जखमी झाले आहेत.
अमर साहेबराव घाडगे (वय- २८, रा. जुन्नर,) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चारचाकी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात गणेश संजय थोरात (वय- २२), शुभम शंकर इंगोले (वय- २१, रा. दोघेही, केसनंद, वाघोली, ता. हवेली), व आदित्य महादेव तावरे (वय- २०, रा. जुन्नर,) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. आज गुरुवारी (ता. २३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघेजण बकऱ्या विकण्याचा व्यवसाय करतात. आज सकाळी फलटण येथील बाजार असल्याने चौघेजण चारचाकी (एम एच १६ किंवा ४६ जीयु ७९८१) गाडीतून निघाले होते. शिंदवणे येथील  कालव्यावर आले असता अमरचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी कठडा तोडून थेट कालव्यात जाऊन पडली.
दरम्यान, ही माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी व सचिन उर्फ  बाळा महाडिक यांनी तात्काळ मदत केली. यावेळी चौघांना गाडीतून बाहेर काढले. त्यात तिघेजण किरकोळ जखमी झाले, तर चालक अमर घाडगे याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान या अपघातानंतर शिंदवणे गावचे माजी सरपंच गणेश महाडिक यांनी, या पुलाचे रुंदीकरणाचे व नुतनीकरणाचे काम तातडीने सुरू केले नाही तर उद्यापासून ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “ऑक्टोबर २०२३ मध्ये मी रस्त्याच्या कामांसाठी व या पुलाच्या कामासाठी उपोषण केले होते. त्यावेळी मला बांधकाम व पाटबंधारे खात्याने या पुलाच्या रुंदीकरणाचे व नूतनीकरणाचे कामासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप हे काम सुरू न झाल्याने या ठिकाणी अपघातांची संख्या वाढलेली आहे.”
सकाळी साडेसहाला झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही उपलब्ध न झाल्याने पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचू शकली नाही, पोलीस घटनास्थळी येण्यास सुमारे दोन तासाचा कालावधी गेला. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीची मदत करण्यास ग्रामस्थांना अडचणीला सामोरे जावे लागले. दोन तासांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली असल्याचे अपघातस्थळी मदत कार्य करणाऱ्या काही नागरिकांनी सांगितले.

Web Title: One person died and three others were injured in an accident where a car fell into a canal uruli kanchan accident nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2024 | 04:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.