
लग्नासाठी तुम्ही इच्छुक आहात? तर लवकर घ्या उरकून; तुळशी विवाहानंतर फक्त 49 दिवस आहेत मुहूर्त
मुंबई : दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या तुळशी विवाहाची अनेकजण वाट पाहतात. या तुळशी विवाहानंतर लग्नाचे अनेक मुहूर्त समोर येतात. असे असताना आता येत्या 2 नोव्हेंबरला चातुर्मास समाप्त होत असून, तुळशी विवाहारंभ होत आहे. शास्त्राप्रमाणे त्यादिवशीपासून सुरू होणारा विवाह मुहूर्ताचा हंगाम जुलै 2026 पर्यंत राहणार आहे. यावेळी फक्त 49 दिवसच विवाहाचे मुहूर्त राहणार आहेत.
यावर्षी आषाढ मासात गुरूचा अस्त असल्यामुळे 8 जूननंतर विवाह मुहूर्त नव्हते. तसेच डिसेंबर 2025 नंतर 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत शुक्राचा अस्त असल्यामुळेही विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे या विवाह हंगामात फक्त 49 दिवसच विवाह मुहूर्त आणि व्रतबंधांचे म्हणजे मुंजीचे फक्त 20 दिवस मुहूर्त आहेत. या काळात शुक्र अस्तोदय काळ 13 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी 2026 असा आहे. २५ जुलै २०२६ ते २१ नोव्हेंबर २०२६ असल्यामुळे विवाह मुहूर्त नाहीत.
हेदेखील वाचा : कोणी मुलगी देता का मुलगी? नोकरी, जमीन असूनही लग्नासाठी मुलांना मिळेना मुलगी; शेतकरी असला तर…
तसेच १७ मे ते १५ जुले २०२६ हा अधिक ज्येष्ठ मास आहे. मुख्य म्हणजे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरू सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंहस्त काळात विवाहाचे मुहूर्त टाळण्याचा सल्ला ज्योतिषांनी विवाह इच्छुकांना दिला आहे.
अशा विवाहाच्या तारखा…
नोव्हेंबर महिन्यात २२, २३, २५, २६,२७, ३० या तारखेला विवाह मुहूर्त आहेत. तर डिसेबर महिन्यात २, ५ तर जानेवारी २०२६ मध्ये शुक्राचा अस्त असल्यामुळे विवाह मुहूर्त नाहीत. फेब्रुवारी महिन्यात ६, ७, १०, ११, १२, २०, २१, २२. २५, २६ हे दिवस तर मार्च महिन्यात 5, ७, ८, १४,१५, १६ याशिवाय एप्रिल महिन्यात २१, २६, २८, २९, ३०, मे महिन्यात १, ३, ६, ८, ९, १०, १३, १४ तर जून महिन्यात १९, २३, २४, २७ आणि जुलै महिन्यात 1, ३, ४, ७, ८, ११ या तारखा असणार आहे.
हेदेखील वाचा : Love Marriage होणार की Arrange Marriage, कुंडलीत कसा दिसून येतो योग? तज्ज्ञ ज्योतिषांनी केला खुलासा