मुंबई : हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या विचारधारांना राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यादरम्यान ट्रॅपमध्ये अडकवायचे होते, असा दावा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे(Only anti-Hindus wanted to trap Raj Thackeray; Allegation of Pravin Darekar).
रविवारी झालेल्या पुण्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबत आपले स्पष्टीकरण दिले. मात्र या दौऱ्यामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी ट्रॅप लावण्यात आले असल्याचाही आरोप त्यांनी नाव न घेता केला होता. मात्र हा ट्रॅप त्यांच्यासाठी हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरोधात असलेल्या लोकांनी लावला होता.
या दौऱ्यासाठी राज ठाकरे गेले असते तर त्या ठिकाणी अनर्थ घडला असता. तेथे गेल्यानंतर मुद्द्यापासून राज ठाकरे यांना भटकण्याचा प्रयत्न झाला असता, असा आरोपही प्रविण दरेकरांनी केला आहे.
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर हे मुख्यमंत्र्यांना करता आले नाही. नामकरण याबाबत मुख्यमंत्र्यांनी कृतीतून काही केले नाही. स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन बाळासाहेबांना आनंद झाला असता, असे शिवसेना म्हणत आहे. मात्र सत्तेसाठी शिवसेना केवळ खाली घसरत चालली असल्याची, टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]