सोलापूर : ग्रामपंचायतीच्या शाश्वत विकासासाठी केंद्र शासनाचा ९ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यात करण्यासाठी रविवारी (दि.२४) ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात २४ एप्रिलला होणाऱ्या ग्रामसभेत केंद्र शासनाचे ९ कलमी कार्यक्रमाची या वर्षापासून अंमलबजावणी करणेत येणार आहे.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत या ९ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करतात येणार आहे. यामध्ये आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृध्द गाव, स्वच्छ गाव हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंह समभाव व पोषक युक्त गाव, गरीब मुक्त गाव या केंद्र शासनाचे ९ संकल्पनेच्या अनुशंगाने राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून या ग्रामसभेचे आयोजन करणेत आले आहे. चालू आर्थिक वर्षापासून या ९ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेत येणार आहे. २०३० पर्यंत या ध्येयाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ग्रामसभाची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर : सीईओ
ग्रामसभांच्या परिणामकारक संचालनासाठी ग्रामसभेतील उपक्रमांची माहिती केंद्र शासनाने तयार केलेल्या “व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड” वर अद्ययावत करणेचे सुचना सर्व गटविकास अधिकारी यांनी देणेस आल्या असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. बाल स्नेही गाव या उद्दिष्ट्यांची पूर्तता गावाने केल्यास पुढील पिढीचे भवितव्य घडविणीस मोलाची मदत होईल.
पंचायत राज संस्थांवर जबाबदारी देण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या १७ ध्येयापैकी ९ कलमी ध्येये पुर्ण करणेचा केंद्राचा मानस आहे. पंचायत राजमधील त्रिस्तरीय व्यवस्थेमधीस सर्वात तळात असणारी पंचायत राज संस्था ग्रामपंचायत यामध्ये महत्वाचे योगदान देऊ शकते. ही सर्व ध्येये साध्य करणेची जबाबदारी केंद्र शासनाने पंचायत राज संस्थाच्या खांद्यावर टाकणेचा निर्णय घेतला आहे.