ई-केवायसी न केल्यास रेशनच होणार बंद
मुंबई : भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याच्या माध्यमातून नागरिकांना मोफत किंवा अत्यल्प दरात अन्नधान्य मिळते. गरीब व गरजू कुटुंबांना सहाय्य मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सरकारने सर्व रेशन कार्डधारकांसाठी केवायसी (KYC) अनिवार्य केले आहे. जर अद्याप तुम्ही केवायसी पूर्ण केले नसेल, तर तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते.
केवायसी करण्याची अंतिम तारीख पूर्वी ३१ मार्च २०२५ होती. मात्र, ही मुदत वाढवून आता ३१ एप्रिल २०२५ करण्यात आली आहे. म्हणजेच केवायसीसाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी उरला आहेकेवायसी करण्याची अंतिम तारीख पूर्वी ३१ मार्च २०२५ होती. मात्र, ही मुदत वाढवून आता ३० एप्रिल २०२५ करण्यात आली आहे. म्हणजेच केवायसीसाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून तुमचे रेशन कार्ड चालू ठेवावे, अन्यथा तुम्हाला पुढे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
New Waqf Act : ‘वक्फ’नुसार पहिली कारवाई! मध्य प्रदेशात बेकायदेशीर मदरसा स्वतःहून पाडला
देशभरातील लाखो रेशन कार्डधारकांनी अद्याप केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य करत अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कार्डधारकाची ओळख स्पष्टपणे पटते, ज्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
रेशन कार्डची केवायसी प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही माध्यमांतून करता येते.
जवळच्या रेशन दुकानात भेट द्या.
तेथे फेस व्हेरिफिकेशन किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते.
‘मेरा केवायसी’ व ‘Aadhaar Face RD’ हे मोबाईल अॅप्स डाउनलोड करा.
अॅपमध्ये तुमचे राज्य निवडा.
आधार क्रमांक टाका.
आवश्यक माहिती भरल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.