NCP Adhiveshan Sharad Pawar : एकेकाळी देशात भारतीय जनता पक्षाचे अवघे दोन खासदार होते. पण आज तोच भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. पण त्यांना घाबरण्याची गरज नाही. आपण सगळे ताकदीने कामाला लागलो तर या राज्याची लढाई पुन्हा जिंकू. आपली लढाई ही तुकाराम विरूद्ध नथुराम अशी आहे. हे कायम लक्षात ठेवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना साद घातली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २६ वा वर्धापन दिन आहे. या निमित्त पुण्यात बालगंधर्व सभागृहात आयोजित अधिवेशनात ते बोलत होते. विशेष म्हणजे याचवेळी त्यांनी, मला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. नव्या नेतृत्त्वाला संधी देण्याची आवश्यकता आहे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
जयंत पाटील म्हणाले, ” आम्ही सगळे तुकाराम महाराजांच्या विचारांचे आहोत. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की, ‘भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’. आता आपल्याला रस्त्यावर उतरून काम करायचं आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी नमुद केलं. पण जयंत पाटील यांनी ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’, असा उच्चार करताच शरद पवार यांनी त्यांच्याकडे पाहत खळखळून हसले.
‘इंदिरा गांधीप्रमाणे नरेंद्र मोदींना संपवू…; खलिस्तानी समर्थकांच्या धमकीनंतर कारवाईची जोरदार मागणी
जयंत पाटील म्हणाले, “2014 साली देशात भाजपची सत्ता आली आणि बरेच लोक आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागले. पण आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेने उभे राहिलो. परिस्थिती प्रतिकुल असो वा अनुकूल, यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही सगळ्यांनी पवार साहेब यांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व असते.
शरद पवार साहेबांनी आजपर्यंत मला खूप संधी दिल्या. प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा कालावधी दिला. पण आता नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांदेखत पवार साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की, मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करावे. पण जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सभागृहात एकच घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी जयंत पाटलांनी आपल्या समर्थकांना शांत बसण्याचे आवाहन केले. तसेच, शेवटी हा पवार साहेबांचा पक्ष आहे. पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. आता आपल्याला खूप पुढे जायचं आहे, त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या संधीसाठी मी साहेबांचे आभार मानतो, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.
भारतात पेट्रोल कार्सची सर्वाधिक विक्री, डिझेल, CNG आणि हायब्रिडसह EV ची मार्केटमधील छापही जाणून घ्या