Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : मनपातही ताकद दाखवून देऊ; पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला विश्वास

नगर परिषदेच्या निकालानंतर से राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मनपा निवडणुकीमध्ये यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 23, 2025 | 06:15 PM
Meghna Bordikar press conference said will win in Parbhani Municipal Corporation elections 2026

Meghna Bordikar press conference said will win in Parbhani Municipal Corporation elections 2026

Follow Us
Close
Follow Us:

Political News : परभणी : जिल्ह्यातील ७ पैकी जिंतूर व सेलू नगराध्यक्ष पदे भाजपने मिळवली असून सोनपेठचे नगराध्यक्ष पद भाजप पुरस्कृत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवाराला मिळाले आहे. नगर पालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले असून मनपा निवडणुकीतही भाजप किती सक्षम पक्ष आहे ते दाखवून देऊ असे राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, जिंतूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर कदम, सेलुचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, “या निवडणुकीत ५५ ते ६० टक्के मुस्लिम मतदार भाजपच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. नगर पालिका निवडणुकीत आजवर भाजपला यश मिळवता आले नव्हते. मात्र २०१४ पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी असून त्यांनी कुठल्याही योजनेचा गरजू व पात्र लाभार्थ्यांना लाभ देताना हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनांचा लाभ नक्की मिळतो ही जाणीव मुस्लिम समाजातील नागरिकांना झाली असल्यानेच त्यांची साथ या निवडणुकीत मिळाली, असा विश्वास मेघना बोर्डिकर यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, निवडणुकीतील गैरकारभार चव्हाट्यावर

कमळ चिन्हावर जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष आणि ३४ नगरसेवक निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. जिंतूरात जेवढी मते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तेवढीच मते नगरसेवकांना मिळाली असून मुस्लिम मतदारांनी भरभरून मते दिली आहेत.
परभणी मनपा निवडणूक भाजप तयारीनिशी लढवणार असून दोन दिवसांत शिवसेनेसोबत युतीबाबत निर्णय होईल. आजवर खान पाहिजे की बाण पाहिजे हा अजेंडा राबवून दोन जाती धर्मात दरी निर्माण करण्याचे काम परभणीतील पुढाऱ्यांनी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

हे देखील वाचा : RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”

गंगाखेड, मानवत येथे आम्ही चांगले नियोजन केले होते, मात्र यश मिळाले नाही. १७२ पैकी ८६ जागा लढवून भाजपने २ नगराध्यक्ष पदे आणि ३४ नगरसेवक पदे मिळवली आहेत. तसेच भाजप पुरस्कृत जनसुराज्य शक्तीचा एक नगराध्यक्ष व ८ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवला आता मनपा निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा राहील आणि हा पक्ष किती सक्षमपणे उभा आहे हे दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिंतूरचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Meghna bordikar press conference said will win in parbhani municipal corporation elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Nanded Politics

संबंधित बातम्या

नांदेडमध्ये सत्ता स्थिर नाही; जिल्ह्यातील नगरपरिषद निकालांनी नेत्यांना दाखवला आरसा
1

नांदेडमध्ये सत्ता स्थिर नाही; जिल्ह्यातील नगरपरिषद निकालांनी नेत्यांना दाखवला आरसा

Nanded News : नगरपालिकेची ‘सत्वपरीक्षा! आमदार चव्हाण, चिखलीकर अन् कोहळीकर झाले पास
2

Nanded News : नगरपालिकेची ‘सत्वपरीक्षा! आमदार चव्हाण, चिखलीकर अन् कोहळीकर झाले पास

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?
3

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?

Nanded News : नशामुक्त नांदेडसाठी उचलले कठोर पाऊल; अन्न व औषध प्रशासनाची कठोर कारवाई
4

Nanded News : नशामुक्त नांदेडसाठी उचलले कठोर पाऊल; अन्न व औषध प्रशासनाची कठोर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.