महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेना युती होणार असल्याची चर्चा सध्या शहरात होत असून नागपूर मध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा मुख्यमंत्र्यांनी नांदेड मधील नेत्यांना बोलावून केली असल्याचे समजते.
देगलूर नगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपकडून सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात आले असून येथील भाजप उमेदवारांना कोणीही वाली उरला नसल्याचे चित्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिसून आले आहे.
आतापर्यंत पक्षाचा अधिकार, आधार घेऊन पक्षाचा वापर स्वतः साठी करुन पक्ष संकटात असताना आणि ऐन निवडणुका सुरू असताना काहींनी पक्षाशी प्रतारणा करत बंडखोरी केली.