सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन युवतीने मुलाला भररस्त्यात चोप दिलाची घटना परभणी जिल्ह्यातील सेलू येथे घडली.
सेलू तालुक्यातील तळतुंबा या गावात राहणाऱ्या मुलीला रवळगाव येथे राहणारा मुलगा दररोज छेड काढत त्रास देत होता.
दोघे ही आपल्या गावाकडून महाविदयालयाला ये-जा करत होते. दरम्यान, दररोज छेड काढत असल्याने अखेर मुलीने मुलास भररस्त्यात गाठून पट्ट्याने चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हीडिओ सध्या जिल्ह्यात व्हायरल होत आहेत.