
मुंबई – पालकांनो (parents) ही बातमी नक्की वाचाच. तुमची बाईक (Bike) तुम्ही 18 वर्षांखालील असलेल्या तुमच्या पाल्याला चालवायला देत असाल तर सावधान. मोटर व्हेकल एक्टनुसार तो गंभीर गुन्हा आहे. 18 वर्षांखालील मुलगा (Boy) किंना मुलगी 50 सीसी पेक्षा जास्त क्षमतेची गाडी चालवताना पकडले गेल्यास, त्यांना 25 हजारांचा दंड आणि 3 वर्षांची शिक्षा (Punishment) होऊ शकते. या नियमाची काटेकोर अंमलबाजवणी करण्याचा निर्णय नुकता राज्य परिवहन विभागानं घेतलेला आहे. त्यामुळं मुलाच्या किंवा मुलीच्या हाती गाडीची किल्ली देताना नक्की काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
25 वर्षांपर्यंत लायसन्सही मिळणार नाही
राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी याबाबतची सूचना 16 जूनला सगळ्या विभागीय परिवहन कार्यालयांना पाठवलेली आहे. अनधिकृत ड्रायव्हर्सवर कारवाई करण्याचे आदेश यात देण्यात आलेले आहेत. मोटर व्हेकल कायद्यानुसार यापुढं कारवाई करण्यात यावी, असंही स्पष्टपणे बजावण्यात आलेलं आहे. अशी मुलं सापडल्यास त्यांना दंड आणि शिक्षा तर होईलच मात्र त्याचबरोबर अशा दोषी असलेल्या मुलांना वयाच्या 25 वर्षांपर्यंत लायसन्सही मिळणार नाहीये.
काय सांगतो कायदा
मोटर व्हेकल कायद्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण झाली नसतील तर कुणालाही सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्याची परवानगी नाहीये. जर ड्रायव्हरचे वय 16 वर्ष असेल आणि बाईक किंवा स्कुटी ही 50 सीसीपेक्षा कमी असेल तरच या नियमात सूट देण्यात आलेली आहे. अल्पवयीन ड्रायव्हर्सच्या विरोधात कठोर कारवाई करा, असे आदेशच नव्या सूचनेत देण्यात आलेले आहेत. याबाबत परिवहन विभागाकडून होत असलेल्या दिंरगाई आणि दुर्लक्षाबाबत चिंताही व्यक्त करण्यात आलेली आहे. राज्यातील दुचाकीधारकांबाबत असलेले कायदे आणि रस्ते सुरक्षेसाठी नियमांची अंमलबाजवणी काटेकोर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी रस्ते अपधातात 15 हजार जणांचा मृत्यू होतोय. 2022 च्या अर्ध्या वर्षात यातले निम्मे अपघात हे दुचाकीधारकांचे झालेले आहेत. त्यामुळे नियमांची कठोर अंमलबजावणी आगामी काळात होणार आहे.