Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १,९४५ सदनिकांची संगणकीय सोडत

कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रास्ताविक केले, तर उपायुक्त अण्णा बोदडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 15, 2025 | 05:16 PM
Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १,९४५ सदनिकांची संगणकीय सोडत
Follow Us
Close
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत डूडूळगाव व किवळे येथे एकूण १,९४५ सदनिकांची संगणकीय सोडत पारदर्शक पद्धतीने घेतली.
  • आमदार शंकर जगताप यांनी सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची महापालिकेची भूमिका अधोरेखित केली.
  • यावेळी घर न मिळालेल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
Pimpri-Chinchwad News:  पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्रेसर असून, केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्यातून गरजू व बेघर नागरिकांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका सातत्याने कार्यरत आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डूडूळगाव येथे उभारण्यात आलेल्या १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या ७५५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवारी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात पार पडली. या सोडतीचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात सदनिका वाटपाची पत्रे देण्यात आली.
Denis Alipov : ‘रशिया कधीही भारताशी मैत्री…’; व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर रशियाच्या राजदूतांनी केली मोठी घोषणा
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सीओईपीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर आगासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे शहर देशात सातव्या क्रमांकाचे व राज्यात पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे हक्काचे घर असावे, हे स्वप्न महापालिका प्रत्यक्षात उतरवत आहे. सदनिकांची संगणकीय सोडत पूर्णतः पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली असून, या वेळी घर न मिळालेल्या नागरिकांनी निराश न होता प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान Jay Bhanushali दिसला मिस्ट्री गर्लसोबत; अभिनेत्रीने उघड केलं सत्य
कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रास्ताविक केले, तर उपायुक्त अण्णा बोदडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार उपायुक्त बोदडे यांनी मानले.
दरम्यान, डूडूळगाव येथील १,१९० व किवळे येथील ७५५ सदनिकांच्या संगणकीय सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

Web Title: Pcmc conducts computerised lottery for 1945 houses under pradhan mantri awas yojana mla shankar jagtap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 05:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.