Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Mayoral Election 2026: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

रवी लांडगे हे शहरातील एक अभ्यासू आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी विविध समित्यांवर काम केले असून, प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 02, 2026 | 05:32 PM
PCMC Mayoral Election 2026

PCMC Mayoral Election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • महापौर पदासाठी आज झालेल्या विशेष सभेत रवी लांडगे यांची अधिकृतपणे निवड
  • रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
  • रवी लांडगे हे शहरातील एक अभ्यासू आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व
PCMC Mayoral Election 2026:  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या महापौर पदासाठी आज झालेल्या विशेष सभेत रवी लांडगे यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आपले पहिले खाते उघडले असून प्रभाग क्रमांक ६ ‘ब’ मधून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. अन्य उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने रवी लांडगे यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

पिंपरी चिंचवडच्या महापौर पदी भाजपचे रवी लांडगे यांची निवड निश्चित झाली असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक निवडून आलेल्या लांडगे आले आहेत. मात्र, या निवडीमुळे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची संधी हुकल्याची चर्चा आहे.

Kolhapur Mayoral Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड 

विधानसभेच्या वेळी काटे यांनी आमदार शंकर जगताप यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा वचपा काढत, जगतापांनीच लांडगे यांच्या नावाला पाठबळ दिल्याचे बोलले जात आहे. मध्ये काही काळ ठाकरे सेनेत जाऊन पुन्हा भाजपमध्ये परतलेल्या लांडगे यांच्या गळ्यात अखेर महापौर पदाची माळ पडली आहे.

रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

२०१७ मध्येही लांडगे यांनीच भाजपचे पहिले खाते उघडले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाला, तर अपक्ष उमेदवार प्रसाद ताठे यांनी लांडगे यांच्या मनधरणीनंतर आपला अर्ज मागे घेतला. रवी लांडगे यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे यांनीही आपला अर्ज मागे घेतल्याने रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले असून, आता केवळ त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

BMC Election 2026: BMCमध्ये भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी

राजकीय पार्श्वभूमी आणि अनुभव

रवी लांडगे हे शहरातील एक अभ्यासू आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी विविध समित्यांवर काम केले असून, प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निवडीमुळे सत्ताधारी पक्षात उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी लांडगे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. यावेळी शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे, वाढत्या वाहतूक कोंडीवर शाश्वत उपाययोजना राबवणे, पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांना गती देणे. महापालिकेचे कामकाज अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करणे” या मुद्द्यांवर भर दिला.

Web Title: Pcmc mayoral election 2026 ravi landge elected unopposed as the mayor of pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 05:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.