Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpalgaon Joga Dam News: पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटला; २५ ते ३० एकर शेतीचे मोठे नुकसान

Pimpalgaon Joga Dam- घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी संतोष निमसे यांनी तातडीने धरण प्रशासनाशी संपर्क साधून पाणी बंद करण्यासाठी पाठपुरावा केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 12, 2026 | 05:45 PM
Pimpalgaon Joga Dam, Canal Breach, Junnar News

Pimpalgaon Joga Dam, Canal Breach, Junnar News

Follow Us
Close
Follow Us:
  • मंगळवारी पहाटे ३ वाजता कालवा फुटला, तेव्हा पाण्याचा विसर्ग २६० क्युसेक इतका प्रचंड होता.
  • सुमारे २५ ते ३० एकर बागायती शेतीचे नुकसान
  • कालवा फुटल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्तन विस्कळीत होऊन शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई
 

Pimpalgaon Joga Dam News: मंगळवारी पहाटेच्या सुमारास पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याला मोठे भगदाड पडून कालवा फुटल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरातील सुमारे २५ ते ३० एकर बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले असून, काही शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे. ऐन उन्हाळ्यात कालवा फुटल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कालव्याला अचानक भगदाड पडले. त्यानंतर कालव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड वाढला. घटनेच्या वेळी कालव्यातून तब्बल २६० क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. पाण्याचा जोर इतका मोठा होता की, ते थेट शेतांमध्ये घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी

या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका संतोष निमसे, सुनील निमसे, पंकज हांडे, शेखर हांडे, शंकर हांडे आणि विश्वास हांडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांना बसला आहे. संतोष निमसे आणि सुनील निमसे यांच्या पाच एकर शेतातील सुपीक मातीच वाहून गेली असून, काढणीला आलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, निमसे कुटुंबाचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेखर हांडे यांच्या ऊस शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उसाचे पीक धोक्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी संतोष निमसे यांनी तातडीने धरण प्रशासनाशी संपर्क साधून पाणी बंद करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर कालव्याचे पाणी बंद करण्यात यश आले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कालव्याला मोठे भगदाड पडल्यामुळे त्याच्या दुरुस्तीस बराच वेळ लागू शकतो. हा कालवा अनेक गावांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असल्याने दुरुस्तीचे काम लांबल्यास नागरिक आणि जनावरांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. “कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पाटबंधारे विभागाने पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी नवनाथ सुकाळे आणि पंकज हांडे यांनी केली आहे.

पुणे-दौंड डेमोच्या चाकांना अचानक आग, प्रवाशांमध्ये घबराट; पाटस रेल्वे स्थानकात काय घडलं?

“शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे महसूल विभागाच्या सहकार्याने बाधित क्षेत्राचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करून, नियमानुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहील.”
— (गणेश नान्नोर)
कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र,१ नारायणगाव.

कालवा फुटल्याची माहिती मिळताच आम्ही तातडीने धरणातून होणारा विसर्ग बंद केला आहे. प्राथमिक पाहणीनुसार, कालव्याच्या विशिष्ट भागात भगदाड पडल्याचे दिसून येत असून, तांत्रिक पथकाद्वारे याची सविस्तर तपासणी केली जात आहे. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, जेणेकरून उन्हाळ्यातील आवर्तन विस्कळीत होणार नाही आणि नागरिकांची पाण्याची सोय लवकर पूर्ववत होईल.”
— आर जी हांडे
उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग पिंपळगाव जोगा).

​”पहाटेच्या वेळी अचानक पाण्याचा आवाज आला आणि बघता बघता उभ्या पिकात पाणी शिरलं. डोळ्यादेखत आमची पाच एकर शेती उध्वस्त झाली आहे. फक्त पीकच गेलं नाही, तर पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की शेतातली सगळी सुपीक माती वाहून गेली आहे. आता तिथे पुन्हा शेती करायची म्हणलं तरी वर्षानुवर्षे लागतील. आमचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सरकारने तातडीने मदत द्यावी, अन्यथा आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल.”
संतोष निमसे (बाधित शेतकरी)

​”ऐन उन्हाळ्यात रक्ताचं पाणी करून ऊस आणि इतर पिके जगवली होती. आता कुठे पीक काढणीला आलं होतं, पण कालवा फुटल्याने सर्व कष्टावर पाणी फिरलं. शेतात गुडघाभर पाणी साचलं असून पिके सडू लागली आहेत. ही प्रशासनाची दिरंगाई आहे, कालव्याची वेळेवर देखभाल केली असती तर आज ही वेळ आली नसती. पाटबंधारे विभागाने केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष मदत करावी.”

 

 

 

 

 

Web Title: Pimpalgaon joga canal breach 30 acres of farmland flooded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • junnar news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.