कॉंग्रेसवाले नीट ऐका! मी जिवंत असेपर्यंत, धर्माच्या नावाने आरक्षण प्रयत्न अन् संविधान बदलण्याचा तुमचा प्रयत्न अपयशी होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
PM Narendra Modi’s in Solapur : मित्रांनो हे माझे सौभाग्य आहे, 2013 मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. मला जेव्हा पंतप्रधान म्हणून चेहरा घोषित केला. तेव्हा मी रायगडावर गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात मी सतत जात असतो. छत्रपती शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी मी कायम जात असतो. छत्रपती शिवरायांच्या शासनाला साताराने पाहिले आहे. साताऱ्याची भूमी शौर्याची भूमी आहे. पंतप्रधान मोदींनी सैनिक परिवाराला 1 रॅंक 1 पेन्शनची गॅरंटी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात आले होते.
भारतीय नौसेनेवर छत्रपती शिवरायांचे निशाण
सगळ्या जगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेनेची दहशत मानत होती. आतापर्यंत नौसेनेवर इंग्रजांचे निशाण होते. परंतु, आम्ही छत्रपती शिवरायांचे निशाण लावले. तेसुद्धा खणकावून दिले. आम्ही मराठा सैन्याने तयार केलेला तामिळनाडूतील गडकोटाला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आणण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. साताऱ्याने महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेतला आहे.
संविधान जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही लागू केले
कॉंग्रेसने 60 वर्ष शासन केले परंतु बाबासाहेबांच्या संविधान जम्मू-काश्मीरमध्ये कॉंग्रेस लागू करू शकले नाहीत. परंतु, आम्ही आर्टीकल 370 हटवले. मी आर्टीकल 370 हटवले ते काय चूक होते का. आम्ही 370 आर्टीकल हटवून जम्मू-काश्मीरमध्ये दलित, ओबीसी, मागास सर्वांना हक्क मिळवून दिला. कॉंग्रेस कर्नाटकात ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देऊ पाहत आहे. मुस्लीमांना ओबीसी म्हणून घोषित करून टाकले. रातोरात मुस्लीमांना ओबीसींच्या कोट्यात घालून त्यांना आरक्षण देऊन टाकले आहे.
मी जिवंत असेपर्यंत
कॉंग्रेसवाले नीट ऐका, मोदी जिवंत आहे, जोपर्यंत जनता जनादर्नाचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत तुम्ही धर्माच्या नावाने आरक्षण आणण्याचा प्रयत्न आणि संविधान बदलण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तुमच्या या प्रयत्नांना मी यशस्वी होऊ देणार नाही.
साताऱ्यात जनऔषधी केंद्रात 80 टक्के डिसकाऊंटने औषधे मिळत आहेत. मी अजून एक गॅरंटी दिली आहे. कोणतेही कुटुंब असू दे 70 वर्षांच्या प्रत्येक नागरिकाला मोफत औषधोपचार सेवा मिळणार आहे. हे तोच करू शकतो, जो तुमच्यासारख्यांमध्ये राहिला असेल.
आज आमची सरकार 80 करोड जनतेला धान्य पुरवत आहे. कॉंग्रेसचे सरकार होती, लाखो टन धान्य गोदामात सडत होते, पाण्यात वाहून जाते परंतु गरिबांना देत नव्हते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेत सांगितले तुम्ही गरिबांना धान्य द्या, परंतु कॉंग्रेसने सांगितले तुम्ही यामध्ये हस्तक्षेप करू नका. तुष्टीकरणामध्ये कॉंग्रेस वाहत चालली आहे. घरोघरी छापेमारी करणार आहे. त्यांची खास व्होटबॅंकसाठी ते काहीही करायला तयार आहेत.
Web Title: Pm narendra modis attack on congress they said congress listen carefully as long as modi is alive attempts at reservation in name of religion and attempts to change constitution will fail nryb