Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Health Department: पुणे महापालिकेत ५८१ आरोग्य पदे रिक्त; रुग्णालये अन् दवाखान्यांवर अतिरिक्त ताण!

वाढती लोकसंख्या आणि संसर्गजन्य आजारांचे आव्हान लक्षात घेता रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आरोग्य विभागात एकूण १,६०० मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ १,०१९ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ५८१ पदे रिक्त आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 02:32 PM
PMC, Pune News, Pune Municipal Corporation, Health Department

PMC, Pune News, Pune Municipal Corporation, Health Department

Follow Us
Follow Us:
  • अधिकाऱ्यांच्या अभावामुळे प्रशासकीय निर्णयप्रक्रिया आणि रुग्णालय व्यवस्थापनात विलंब
  • लसीकरण, प्रयोगशाळा तपासण्या आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत अडथळे
  • रुग्णालयांची स्वच्छता, रुग्णांची देखभाल व इतर सहाय्यक सेवांवर गंभीर परिणाम.
 

PMC Health Department:  महापालिकेच्या आरोग्य विभागात तब्बल ५८१ पदे रिक्त असल्याचे समोर आले असून, याचा थेट परिणाम शहरातील सार्वजनिक आरोग्य सेवेवर होत आहे. डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महापालिकेची रुग्णालये, प्रसूत्तिगृहे, दवाखाने तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर अतिरिक्त ताण पडत आहे.

वाढती लोकसंख्या आणि संसर्गजन्य आजारांचे आव्हान लक्षात घेता रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आरोग्य विभागात एकूण १,६०० मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ १,०१९ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ५८१ पदे रिक्त आहेत.

Sanjay Raut On PM Modi: नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात

आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक

याशिवाय वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदेही निर्णयप्रक्रिया आणि सेवा व्यवस्थापनावर परिणाम करत आहेत, वर्ग-४ मधील कर्मचाऱ्याऱ्यांची कमतरता रुग्णालयांतील सहाय्यक सेवांवर परिणाम करत असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आणि इतरसंसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असताना आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे.

 

पदांची कमतरता आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी

सर्वाधिक रिक्त पदे वर्ग-३ मध्ये असून या संवर्गातील कर्मचारी आरोग्य केंद्राचे दैनंदिन कामकाज, लसीकरण, रोगनियंत्रण, प्रयोगशाळा सेवा आणि प्रशासकीय कामकाजात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे या पदांची कमतरता आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी ठरत आहे.

Mumbai Police Salary Scam: पोलीस दलातील ६.५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात ५ जणांवर गुन्हा; मंत्रालयातील अधिकारी रडारवर

संवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती

वर्ग-१: १४५ पैकी ३८ पदे रिक्त
वर्ग-२: २६९ पैकी ८८ पदे रिक्त
वर्ग-३: ८७१ पैकी सर्वाधिक ३७३ पदे रिक्त
वर्ग-४: ३१५ पैकी ८२ पदे रिक्त

महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील पदांची सद्यस्थिती अशी आहे: एकूण मंजूर पदे १,६००, कार्यरत कर्मचारी १,०१९ आणि रिक्त पदे ५८१ आहेत

एकूण मंजूर पदे १,६००,
कार्यरत कर्मचारी १,०१९ आणि
रिक्त पदे ५८१

Web Title: Pmc health department 581 vacancies public health impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.