Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; 3 हजार पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त

कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2025 | 11:57 AM
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; 3 हजार पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; 3 हजार पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : कार्तिकी शुद्ध एकादशी येत्या रविवारी (दि.2) असून, या यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.

कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिक्षक, एक अप्पर पोलीस अधिक्षक, 12 पोलीस उपअधिक्षक, 30 पोलीस निरीक्षक, 127 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 386 पोलीस अंमलदार व 1 हजार 500 होमगार्ड तसेच 2 एसआरपीएफ कंपनी, 4 बीडीएस पथके, आरसीपी दोन पथके, क्युआरटी दोन पथके, आपत्‍कालीन परिस्थिती हातळण्यासाठी प्रशिक्षित 10 कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

तसेच जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने 8 ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहे. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड यांसह आदी ठिकाणी 12 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.

माऊली स्कॉडची स्थापना

वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापन करण्यात आली असून, यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

पाच अतिक्रमण पथके तैनात

वारकरी भाविकांना रहदारीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी 5 अतिक्रमण पथके नेमण्यात आली आहेत. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण आदी 7 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून…

वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतूक शहराबाहेरुन वळवण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी शहराबाहेर 12 तर शहराअंतर्गत 10 ठिकाणी डायव्हर्जन पॉईंट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर 16 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असून, या ठिकाणी सुमारे 10 ते 11 हजार वाहनांची पार्किंग व्यवस्था होणार आहे.

पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे

वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी डगळे यांनी केले.

Web Title: Police department prepares for kartiki ekadashi there will be strong security of 3 thousand policemen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • Pandharpur News
  • Police Department

संबंधित बातम्या

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; सर्व पीके पाण्याखाली, आता सरकारच्या मदतीकडे डोळा
1

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; सर्व पीके पाण्याखाली, आता सरकारच्या मदतीकडे डोळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.