Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, एकाच वेळी ५ नवीन DCPची नियुक्ती

पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट १, पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 28, 2025 | 11:49 AM
Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, एकाच वेळी ५ नवीन DCPची नियुक्ती
Follow Us
Close
Follow Us:

Police Officers Transfer: महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने ५१ भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आणि ८१ राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख शहरांसह अनेक जिल्ह्यांमध्ये या बदल्या करण्यात आल्या आहेत. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. या निर्णयाचे उद्दिष्ट प्रशासकीय काम मजबूत करणे आणि पोलिस यंत्रणा अधिक प्रभावी बनवणे आहे.यामध्ये 51 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचा समावेश असून, काही अधिकाऱ्यांना पदोन्नती तर काहीं  अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत.

पुण्यातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे बदली करण्यात आली आहे. तसेच, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली झाली आहे.  सरकारच्या नव्या आदेशानुसार, पुणे शहरात तीन नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Canada-China Relations : कॅनडाचा चीनवर मोठा घाव! ‘या’ कंपनीला देशातून हाकलले, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्याही सुरूच

 गेल्या पंधरा दिवसांत आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मागील आठवड्यात आणखी चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच, अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची पुण्यातील यशदा (YASHADA) संस्थेच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले आहे, असे दिसून येत आहे.

या अधिकाऱ्यांना मिळाली नवीन जबाबदारी

या बदल्यांच्या क्रमानुसार, पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट १, पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (डीसीपी) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी (वाहतूक) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे.कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे, एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत डीसीपी म्हणून बढती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाजारात आले Xiaomi चे नवे AI स्मार्ट ग्लासेस, AI असिस्टेंटसह मिळणार 12MP कॅमेरा! थक्क करणारी बॅटरी

पुणे शहरातील शस्त्र निरीक्षक शाखेच्या पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असलेल्या तेजस्वी सातपुते यांची समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांना पुणे राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक 1 मध्ये समादेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही बदली राज्य सरकारच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या निर्णयांतर्गत करण्यात आली असून, तेजस्वी सातपुते यांची ही नियुक्ती प्रशासकीय दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

पोलिस प्रशासन मजबूत करण्यासाठी प्रयत्न

या बदल्यांद्वारे, राज्य सरकारने केवळ मोठ्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन मजबूत करण्याचा प्रयत्न केला नाही तर महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. येत्या काळात ही प्रक्रिया वेगवान केली जाऊ शकते जेणेकरून राज्यभरात पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम करता येईल.

 

Web Title: Police officers transfer 51 ips officers transferred in maharashtra 5 new dcps appointed at the same time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 11:49 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.