कल्याण : ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. विकास माने असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून, तो ठाणे पोलीस दलात कार्यरत आहे. विकासवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.
विकास आणि त्याच्या पत्नीचे वाद
दरम्यान, विकास आणि त्याच्या पत्नीचे वाद सुरू असून, विकासला पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून वारंवार धमकी व दबाव टाकला जात असल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलण्याचा आरोप विकासच्या नातेवाइकांनी केला. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज रोडवरील शंकेश्वर कृपा इमारतीमध्ये विकास माने आपल्या कुटुंबासह राहतात. विकास माने हे ठाणे पोलीस दलात कार्यरत आहेत. आज सकाळच्या सुमारास विकास माने यांनी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच विकासचे नातेवाईक व त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून सखोल तपास करून ठोस कारवाई
विकास व त्याच्या पत्नीचे वाद सुरू असून, विकास यांना वारंवार धमकी व दबाव टाकला जात असल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलत आरोप विकास यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करून ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाणे जिल्हा पोलीस बॉईज संघटना ते अध्यक्ष उमेश भारती यांनी केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे.