
Popular sculptor Ram Sutar passed away at the age of 101 Maharashtra news update
राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी गुरुवारी पत्रकारांशी शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की माझे वडील श्री राम वंजी सुतार यांचे १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री आमच्या घरी निधन झाले.” राम सुतार यांच्या जाण्याने कलाविश्वामध्ये शोक पसरला आहे. सर्व स्तरातून राम सुतार यांना आदरांजली वाहिली जात आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार असलेले राम सुतार हे महाराष्ट्रातील होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. सध्याच्या महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुतार यांना लहानपणापासूनच शिल्पकलेची आवड होती.
हे देखील वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; संजय राऊत घेणार शरद पवारांची भेट, कारण…
महाराष्ट्र भूषण राम सुतार
राम सुतार यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना अलिकडेच राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वर्षीच म्हणजे 2025 मध्ये राम सुतार यांना महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थित राहून त्यांच्या शिल्पकलेचा गौरव केला. मागील बऱ्याच काळापासून वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते आणि बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.
हे देखील वाचा : ‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न; भाजपच्या नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राम सुतार यांचे कार्य
मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चरमधील सुवर्णपदक विजेते राम सुतार यांच्या नावावर अनेक पराक्रम आहेत. संसद संकुलात ध्यानस्थ अवस्थेतील महात्मा गांधी आणि घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी यांचे प्रसिद्ध पुतळे हे त्यांच्या उत्कृष्ट निर्मितींपैकी एक आहेत. शिवाय, गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे डिझाईन देखील त्यांनी केले होते.