
फोटो सौजन्य: Gemini
नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून नगरपंचायत कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्या दालनात बळजबरीने घुसखोरी करून सरकारी कामकाजात अडथळा आणला, तसेच दालनाचा ताबा घेऊन मालमत्तेचे नुकसान केले. या घटनेमुळे नेवासे शहरासह परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
5 कोटी रुपये द्या, नाहीतर…; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून तरुण व्यवसायिकाला धमकी
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, या घटनेचे सोशल मीडियावर प्रसारण करून आपली तसेच नगराध्यक्षपदाची बदनामी करण्यात आली. संबंधित जमावाने शिवीगाळ, दमदाटी करत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला. दालनात गोंधळ घालून दहशत निर्माण करण्यात आली, ज्यामुळे नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले.
नगराध्यक्षांनी असा आरोप केला आहे की, हा जमाव जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने आला होता आणि नगरपंचायतीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
फिर्यादीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, सदर जमावातील काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्याविरुद्ध पूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असून, नगराध्यक्षपदाचे दैनंदिन कामकाज करणेही धोकादायक व भीतीदायक झाले आहे. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे.
नेवासे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात उपनगराध्यक्षा शालिनी संजय सुखधान, आम आदमी पार्टीचे नेते संजय लक्ष्मण सुखधान, स्वीकृत नगरसेवक राजू काळे, जालिंदर गवळी, असिफ पठाण, जयश्री शिंदे, दिनेश व्यवहारे, सोनल चव्हाण, अजय त्रिभुवन, उमेश इंगळे, जितेंद्र कुन्हे, अनिल शिंदे, स्वप्नील मापारी, धनू काळे, अनिकेत मापारी, संभाजी धोत्रे, जयदीप जामदार आणि इतर ८ ते १० जणांचा समावेश आहे.