गारव्याने नागरिक सुखावले; शेतपिकांना मात्र मोठा फटका
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात परतीच्या पावसाने दमदारी हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान आज ; 39 लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क
दक्षिण-मध्य महाराष्ट्रापासून कोकणच्या दक्षिण भागात येत्या 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह या भागांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवट जरी पावसाने होणार असला तरीही ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही.
सांगली, कोल्हापूरला पावसाचा ‘येलो अलर्ट’
सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर धाराशिव, लातूर, बीड, सातारा, पुणे, नगर, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.
कुठे पाऊस, कुठे ढगाळ वातावरण
सोमवारचा पाऊस वगळता हवामानात फारसे बदल घडून येणार नाहीत. राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह इतर किनारपट्टी भागात वातावरण अंशतः ढगाळ राहिल. तर तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहील. या भागांमध्ये पावसाचा जोर मात्र वाढणार नाही.
हेदेखील वाचा : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना जारी; ‘हा’ आहे हेल्पलाईन क्रमांक